vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सुपा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विकासकामांची पाहणी विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश

सुपा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विकासकामांची पाहणी-विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश…

 

पुणे प्रतिनिधी

-सुपा येथील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यात विविध विकासकामे सुरु असून ही विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश सार्वजनिक विकासकामांच्या पाहणीप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

श्री. पवार यांनी शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे शासकीय विश्रामगृह व परिसर सुशोभीकरण, सुपे परिसरातील उप जिल्हा रुग्णालय, पोलीस ठाणे इमारत, बाजार समितीकडील रस्ता व संरक्षण भिंत, काऱ्हाटी येथील कऱ्हा नदीवरील पुलाची रेखा (अलाईनमेंट) निश्चित करणे आदी विकासकामांची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मुंडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे शासकीय विश्रामगृहाचे नूतनीकरण व परिसर सुशोभीकरणाची कामे करताना परिसरातील जागेचे सपाटीकरण करुन घ्यावे. नूतनीकरण करण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये पाणी गळती होणार नाही, कक्षामध्ये खेळती हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश राहील, कामे पूर्ण झाल्यावर कमीतकमी देखभाल दुरुस्ती होईल, यादृष्टीने कामे करावीत. परिसरात अधिकाधिक वृक्षांची लागवड करावी. विश्रामगृहात येणाऱ्यांकरिता बैठक व्यवस्था, संरक्षक भिंत, वाहनांकरिता दर्जेदार वाहनतळ तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आदीबाबत आराखडा तयार करण्यात यावा.

परिसरातील जळोची मार्गावरील पदपथावर नागरिकांना अडथळा निर्माण करणाऱ्या वृक्षाच्या फांद्याची छाटणी करावी. नक्षत्र बगीच्याची संरक्षण भिंत पुरेशा उंचीची करावी. स्व.नानासाहेब सातव चौकातून विनाअडथळा वाहने बाहेर निघाली पाहिजेत, यादृष्टीने चौकाची कामे करावीत.

सुपा कृषी उत्पन्न बाजार समितीची संरक्षक भिंत, रस्ते, मुख्य दरवाज्याचे बांधकाम सुरु करावे. सुपा पोलीस ठाण्याच्या मुख्य दरवाजाचे कामे करताना मुख्य इमारतीचा उंचीचा विचार करण्यात यावा. सुपे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याबाबत निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून प्रशासन आणि नागरिकांनी जागा निश्चित करावी, असे श्री. पवार म्हणाले.

संबंधित पोस्ट

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर गावाला कोणताही धोका नाही-नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून समाजाने लेखणी हातात घेतली – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले • समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी• जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न …

प्रेस फोटोग्राफर निनाजी भगत, रविकिरण टाकळकर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर डॉ.गजेंद्र निकम यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

vishwatmaklokswamivarta

सेवा पंधरवडा : जळगाव जामोद तालुक्यातील महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांना लाभांचे वितरणआमदार डॉ संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबिरा’चे उद्घाटन