vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान पोष्टरचे जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते विमोचन

रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान पोष्टरचे जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते विमोचन

बुलडाणा, प्रतिनिधी: राज्य शासनाच्यावतीने दि. 1 ते 31 जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा महिना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नेहरु युवा केंद्रामार्फत रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत दि. 17 ते 23 जानेवारी दरम्यान विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले असून रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान पोष्टरचे विमोचन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच करण्यात आले.

याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, ‍निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, नेहरु युवा केंद्राचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनाचे ‍जिल्हा समन्वयक डॉ. हनुमंत भोसले, श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फॉर्मसी व रासेयो कार्यक्रम अधिकारी पवन जगताप, जिजामाता महाविद्यालय एनसीसीचे लेफ्टनंट पवन ठाकरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी गजानन लोहटे, नेहरु युवा केंद्राचे सेवानिवृत्त सहाय्यक धनंजय चाफेकर व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

  भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत असलेले नेहरु युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना, श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फॉर्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. उपप्रादेशीक परिवहन कार्यालय व वाहतूक शाखा पोलीस विभाग बुलढाणा यांच्या सहकार्याने अयोजित या अभियानात हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करा, नशा करुन वाहन चालवू नका, अपघात प्रसंगी जख्मीना मदत करा, रस्ता सुरक्षा ‍नियम पाळा असे संदेश पथनाट्यामध्यून राष्ट्रीय सेवा योजना व श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फॉर्मसी बुलढाणाच्या विद्यार्थ्यांनी दिला.0000000

संबंधित पोस्ट

अपीलकर्त्याच्या गैरवर्तणुकीमुळे तीन वर्षे सुनावणीस बंदी-राज्य माहिती आयुक्तांचे आदेश

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर

vishwatmaklokswamivarta

पुढील वर्षासाठीच्या 820 कोटींच्या प्रारूप विकास आराखड्यास मान्यता* – *पालकमंत्री शंभूराजे देसाई*

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर ! अतिवृष्टीबाधीत भागांची केली पाहणी आपत्तीग्रस्त भागांचे युद्धपातळीवर पंचनामे करा गावकऱ्यांनी पंचनामे पूर्ण करुन घ्यावे  पंचनाम्याचे चावडी वाचन करा

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापनकरिता उपाययोजना करण्यासाठीदि.30 व दि.31 मे या दोन दिवसांसाठी पायरी मार्ग राहणार पूर्णपणे बंद

समृद्ध भविष्याच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे यशस्वी डेस्टिनेशन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· इंडो- अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स राष्ट्रीय परिषद २०२६