vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एसटी महामंडळाचा उपक्रम;-प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन

एसटी महामंडळाचा उपक्रम;-प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन

बुलढाणा, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाकडून प्रवाशांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या, तक्रारी व सुचनांचे आगार पातळीवर जलदगतीने निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात दर महिन्याच्या बुधवारी सकाळी १० ते २ या वेळेत “प्रवासी राजा दिन” व दुपारी ३ ते ५ या वेळेत “कामगार पालक दिन” आयोजित करण्यात येणार आहे.

त्याअनुषंगाने जुलै महिन्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून प्रवाशी आणि महामंडळाचे कामगारांनी लाभ घेऊन समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतील. तसेच दुपारी ३ ते सांयकाळी ५ दरम्यान कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटना, कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक प्रश्न, तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे किंवा समस्यांचे तात्काळ निराकरण करतील.

बुलडाणा विभागातील बुलढाणा आगार येथे बुधवार २ जुलै, चिखली आगार येथे बुधवार दि. ९ जुलै, खामगाव आगार येथे बुधवार दि. १६ जुलै, मेहकर आगार येथे बुधवार दि. २३ जुलै, मलकापुर येथे बुधवार दि. ३० जुलै, व जळगाव जामोद येथे दि. ६ ऑगस्ट रोजी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

0000000

संबंधित पोस्ट

🏅 कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार 2025🏆

कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत सध्याच्या सोडत पध्दतीबाबत-शेतकऱ्यांचे अभिप्राय नोंदविण्याबाबत कृषी विभागानी केले आवाहन

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट,सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिकांना कौन्सिलिंगव्दारे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण 

नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 उमेदवारांना आता ऑफलाईन पध्दतीनेही नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार- रविवार दि.16 नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी-हडकोच्या 2 हजार कोटींच्या कर्जास शासन हमी, हमी शुल्क माफ