vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

पुनर्रचित हवामान आधारित पेरू, लिंबू, चिकू व मोसंबी या फळपीकासाठी विमा योजनेत मुदतवाढ

पुनर्रचित हवामान आधारित पेरू, लिंबू, चिकू व मोसंबी या फळपीकासाठी विमा योजनेत मुदतवाढ

छात्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- केंद्र शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजने अंतर्गत पेरू, लिंबू, चिकू व मोसंबी या फळपिकांसाठी विमा काढण्याची अंतिम मुदत आता 8 दिवसांनी (03 जुलै ते 10 जुलै) वाढविण्यात आली आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत 30 जून होती.

शासनाच्या 12 जून 2024 च्या निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. 30 जून 2025 पासून आधार संकेतस्थळाबाबत (पोर्टलबाबत) समस्या उद्भवल्याने शेतकऱ्यांना विमा अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. याची दखल घेऊन केंद्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून, योजनेत सहभागी होण्यासाठी 03 जुलै 2025ते 10 जुलै 2025अशी 8 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या योजनेच्या संकेतस्थळ www.pmfby.gov.in वर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

समृद्धीचा बॉयलर पेटला; एप्रिलअखेर एक टीपरुही गाळपाविना राहणार नाही – सतीश घाटगेगाळप हंगामाला प्रारंभ: १० हजार मे. टन क्षमतेच्या दुसऱ्या युनिटसह -२४ मेगावॅट को-जनरेशन प्रकल्पाची पायाभरणी

vishwatmaklokswamivarta

ठाणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न..

प्रमाणित बियाणे वितरण बाबीमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांकरीता लक्षांक प्राप्त

vishwatmaklokswamivarta

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” योजनेचा लाभ घेण्यासाठी मातंग समाजातील विद्यार्थी/विद्यार्थीना दि.20 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

उद्योग विभागांतर्गत “मैत्री सेल”च्या माध्यमातून उद्योग सुरू करण्याबाबत मिळणार मोफत मार्गदर्शन

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाकरिता मिनी ट्रॅक्टरसाठी-स्वयंसहाय्यता बचत गटांना 31 मे पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..