vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासह अत्याधुनिक सुविधा देण्यास कटिबद्ध – मंत्री प्रकाश आबिटकर

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासह अत्याधुनिक सुविधा देण्यास कटिबद्ध – मंत्री प्रकाश आबिटकर

नशिक, प्रतिनिधी : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी दूरवर जावे लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवरच सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक त्या सुविधा, मनुष्यबळ व वैद्यकीय साधनसामग्री उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी ग्रामीण रुग्णालय सुरगाणा येथे भेट देत पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नितीन पवार,आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे,निवासी वैद्यकीय अधिकारी संदीप सूर्यवंशी, डॉ. आनंद पवार,सुरगाणा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संदीप चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ .सचिन वानखेडे यांच्यासह संबंधित अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री. आबिटकर यांनी रुग्णालयातील रुग्णांशी संवाद साधत त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

मंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता, रुग्णसेवा, औषधांची उपलब्धता आणि वैद्यकीय उपकरणांची कार्यक्षमता याबाबत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी निर्देशित केले.

मंत्री श्री. आबिटकर यांनी सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयांची पाहणी करताना बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, प्रसूती विभाग, प्रयोगशाळा, औषध भांडार, रुग्ण कक्ष आदी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळत आहेत का, याबाबत त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध विभाग, उपलब्ध वैद्यकीय सुविधा, औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचार सेवांची माहिती घेतली.

यावेळी 3० खाटांच्या ग्रामीण रुगालय व सुरगाणाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन झाल्याने अतिरिक्त २० खाटांच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूूजन मंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

0000000

संबंधित पोस्ट

केंद्रीय अर्थसंकल्प : ‘बायोफार्मा शक्ती’ उपक्रमासाठी १०,००० कोटींची तरतूद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मानले आभार

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल, मला या प्रेमातच राहायचे आहे! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन स्पर्धेत शेतकरी विनायक थोरात यांच्या देवणी वळूंनी मारली बाजी…

vishwatmaklokswamivarta

कौशल्य विकासाच्या माध्यमातून राज्यात किमान ५ लाख उद्योजक निर्माण करण्याचे प्रयत्न- कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा…

नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीची तयारी पूर्ण-नगराध्यक्षासाठी २३ तर नगरसेवकसाठी ३३९ उमेदवारांचा निकाल होणार स्पष्ट..

vishwatmaklokswamivarta