vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर

इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, प्रतिनिधी : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित करून घेण्याचे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने केले आहे.

संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १५,५२,६७८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून १३,४३,४१८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र, काही विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश निश्चित न केल्यामुळे ही विशेष फेरी आयोजित करण्यात आली आहे. या फेरीसाठी २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर २३ ऑगस्ट दुपारी १ वाजल्यापासून २४ ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी, भाग-१ मधील दुरुस्ती तसेच भाग-२ भरून अर्ज लॉक करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. विद्यार्थ्यांनी किमान १० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविणे अनिवार्य राहणार आहे.

प्रवेश वाटप प्रक्रिया २५ ऑगस्ट २०२६ रोजी राबविण्यात येणार असून त्याचदिवशी दुपारी ३ वाजता प्रवेश वाटपाची यादी, कट-ऑफ यादी तसेच विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी २५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आवश्यक कागदपत्र पडताळणी व शुल्क भरून प्रवेश निश्चित करावेत. यानंतर २८ ऑगस्ट रोजी संबंधित प्रशासकीय कामकाज, २९ ऑगस्ट रोजी डेटा प्रोसेसिंग आणि ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रिक्त जागांची पुढील माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

 

००००

संबंधित पोस्ट

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयांमधील तपासणी व उपचार हे नि:शुल्क..

vishwatmaklokswamivarta

झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या दोन बहुमार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता; यामुळे रेल्वेचे जाळे सुमारे 318 किलोमीटरने वाढणार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्ज तपासणीस 31 जुलै पर्यंत मुदतवाढ

भारतातील डिजिटल परिवर्तन संसदीय लोकशाहीसाठी अभिमानास्पद- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे• बार्बाडोस येथील ६८ व्या सी.पी.ए. आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये महत्वपूर्ण विषयांवर चर्चासत्र• लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळात भारतातील राज्य विधानमंडळ पीठासीन अधिकारी यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

सुभेदारीच्या व्हीव्हीआयपी सुट चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी..

vishwatmaklokswamivarta