vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जलशक्ती अभियानपावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

जलशक्ती अभियानपावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी येत्या पावसाळ्यात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब हा जमिनीत जिरवून प्रत्येक पाणलोटक्षेत्रनिहाय विकास करावा, जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जलशक्ती अभियानाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके, ग्रामिण पाणी पुरवठा उपअभियंता श्रीमती एम.जी. नांद्रे, सहा. पशु आयुक्त पशुसंवर्धन डॉ. आर.डी. इंगळे, उपजिल्हाधिकारी रोहयो रुपेश सिंगारे, जिल्हा दुग्धविकास अधिकारी मनिषा हराळ –मोरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गौडा यांनी यावेळी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचाही आढावा घेतला. जलशक्ती अभियानांतर्गत पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊ देता कामा नये. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवता आला पाहिजे यासाठी विविध जलोपचार करावे लागतील. त्यात लहान लहान समतल चर, शोष खड्डे, बंडिंग, भूमिगत रिचार्ज शाफ्ट, लहान लहान बंधारे, नाला खोलीकरण, विहीरींचे पुनर्भरण असए विविध उपक्रम राबविता येतील. या उपाययोजना विविध विभागांमार्फत राबविण्यात येत आहेत. त्यात जलयुक्त शिवार सारख्या अभियानातील कामांचाही समावेश आहे. त्या त्या भागातील पाणलोट क्षेत्रनिहाय पाणी अडवून ते ते क्षेत्र विकसीत करावे. पावसाचे पडणारे पाणी जमिनीत जिरवण्याचा निर्धार आपण केला पाहिजे. जलसंचय जन भागिदारी या उपक्रमाचा भाग म्हणून या प्रत्येक उपक्रमात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे,असेही त्यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या दोन प्रकल्पाचे लोकार्पण

मूल्य साखळी भागीदारीसाठी शेतकरी उत्पादक कंपनी,सहकारी संस्थांनी अर्ज 

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात SIR अंतर्गत अपर जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी

औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश

जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे- गोरक्ष लोखंडे- इस्लामपूर, आष्टा येथील बैठकीत निर्देश- आर्थिक दुर्बल, अनुसूचित जाती जमातीसाठीच्या निधीचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ.

vishwatmaklokswamivarta