vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लातूर जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख आणि त्यांच्या अधिपत्याखालील निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणींचे निवारण करण्यासाठी आज लातूर येथे विशेष कार्यशाळा आणि पेन्शन अदालतीचे आयोजन

लातूर जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख आणि त्यांच्या अधिपत्याखालील निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणींचे निवारण करण्यासाठी आज लातूर येथे विशेष कार्यशाळा आणि पेन्शन अदालतीचे आयोजन

राज्य प्रतिनिधी-लातूर जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख आणि त्यांच्या अधिपत्याखालील निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणींचे निवारण करण्यासाठी आज लातूर येथे विशेष कार्यशाळा आणि पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर महालेखाकार आणि लातूर जिल्हा कोषागार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील डीपीडीसी हॉलमध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत नागपूर महालेखापाल कार्यालयाचे वरिष्ठ लेखाधिकारी मैथिली जगन्नाथन, सहायक लेखाधिकारी चेतनकुमार गुप्ता आणि लेखापाल समिर मीना यांनी उपस्थित सर्व कार्यालय प्रमुखांना निवृत्ती वेतन प्रकरणे (पेंशन पेपर्स) अत्यंत अचूकपणे कसे सादर करावेत, याबाबत सविस्तर व तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच निवृत्तीवेतनधारकांना येणाऱ्या विविध अडचणी व समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांचे जागेवरच निराकरण केले.

या बैठकीला लातूर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्वला भा. पाटील, अप्पर कोषागार अधिकारी ख.नै. खोजे, मा.रो. गुट्टे आणि ना. ए. बुध्दिवंत प्रामुख्याने उपस्थित होते. या पेन्शन अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी आर. डी. माने, स्वामी एस.एस., कुलकर्णी ए.डी., एस.व्ही. बिराजदार, ब.म.पांचाळ, अ.द.सिरसाट आणि नामदेव कोकरे यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेला जिल्ह्यातील बहुसंख्येने कार्यालय प्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी आणि निवृत्तीवेतनधारक उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत सार्वजनिक स्थळांची लोकसहभागातून स्वच्छता..

निवृत्तीवेतन प्रकरणी येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी दि.27 जून रोजी ठाणे येथे पेन्शन अदालतीचे आयोजन

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर निधी अंतर्गत खरोळा सर्कलमधील 2 ग्रामपंचायतीला मिळणार प्रत्येकी 75 लाख रुपयांचा निधी…आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या प्रयत्नांना मोठं यश!

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये ज्ञानक्षम व्हावे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री  यांनी सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे केले स्वागत..

जळगाव जिल्ह्यातील पाच तालुके डी+ करण्यास तत्वतः मंजुरी- उद्योग मंत्री उदय सामंत

नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना-नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आवश्यक दुरुस्ती व देखभाल कामांमुळे काही विभागांमध्ये साप्ताहिक पाणीपुरवठा बंद राहणार आहे.