vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेप्रदेश

नाशिक जिल्ह्यात खळबळजनक  धक्कादायक!बातमी- गावच्या सरपंचानेच केला दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, आरोपी अटक

नाशिक जिल्ह्यात खळबळजनक  धक्कादायक!बातमी- गावच्या सरपंचानेच केला दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, आरोपी अटक

 

नाशिक प्रतिनिधी-नाशिक जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. गावच्या सरपंचानेच दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. सरपंचाने मुलींच्या आजीच्या मदतीने या दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सरपंच साईनाथ कोल्हे, संजय पवार व आजी संगीता आहीरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की चांदवडच्या विटावे गावात सदर घटना घडली आहे. मागील काही दिवसांपासून आरोपीने वारंवार पीडित मुलींना आपल्या वासनेचा शिकार बनवले आहे. त्याने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर आणि विटावे अशा ठिकाणी शरीरसंबध ठेवल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे संशयित आरोपीसोबत जाण्यास जेव्हा पीडित मुलींनी नकार दिला, तेव्हा आजीने दोघींना चावा घेत व शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करुन घरात कोंडून ठेवले. आजीसह आरोपींच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलींनी चांदवड पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सरपंच साईनाथ कोल्हे, संजय पवार व आजी संगीता आहीरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

संबंधित पोस्ट

भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन**महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण*

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन डेहराडून, बडोदा, दिल्ली, बेळगाव, गोवा येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव

vishwatmaklokswamivarta

जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गतपीक पध्दती, पाण्याचे नियोजनाबाबत चर्चासत्र संपन्न..

जालना शहरातील चार परीक्षा केंद्रांभोवती 200 मीटर परिसरात जमावबंदी लागू- 31 मे रोजी परीक्षा केंद्र परिसरात कलम 163 लागू 

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५’ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अन्न व्यवसाय चालकांसाठी अन्न सुरक्षा मार्गदर्शक सूचना;सूचनांचे काटेकोर पालन करा-अन्न सुरक्षा विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta