vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकरिता नवी दिल्ली येथे परिषदेचे आयोजन

राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकरिता नवी दिल्ली येथे परिषदेचे आयोजन..

 

राज्य प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची ४ व ५ मार्च, २०२५ रोजी दोन दिवसांसाठी भारत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM), नवी दिल्ली येथे परिषद आयोजित केली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचे अध्यक्षतेखाली होणारी ही अशी पहिलीच परिषद आहे. मुख्य निवडणूक आयुक्त यांनी अगदी प्रथमच या परिषदेकरीता जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांना नामनिर्देशित करण्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांना सूचित केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी हे वैधानिक प्राधिकारी म्हणून राज्य, जिल्हा व मतदार संघाकरीता महत्वाचे अधिकारी आहेत.

या दोन दिवसीय परिषदेतून राज्य तसेच केद्रशासीत प्रदेशांच्या अधिकाऱ्यांना विचारमंथन व परस्परांना आलेले अनुभव यातून शिक्षणासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या दोन दिवसीय परीषदेच्या पहिल्या दिवशी आधुनिक निवडणूक व्यवस्थापनातील मुख्य क्षेत्रासह आयटी आर्किटेक्चर, प्रभावी संप्रेषण, सोशल मीडियाचा प्रसार वाढवणे आणि मतदान प्रक्रियेतील विविध अधिकाऱ्यांची वैधानिक भूमिका यासह प्रमुख मुद्यांवर चर्चा होईल. परीषदेच्या दुसऱ्‍या दिवशी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी पहिल्या दिवशी झालेल्या मुद्देनिहाय चर्चेच्या अनुषंगाने आपला संबंधित कृती आराखडा सादर करतील, असे भारत निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

संबंधित पोस्ट

नवी मुंबईच्या महापौरपदी श्रीम.सुजाता पाटील व उपमहापौरपदी श्री.दशरथ भगत विराजमान…

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पेपरफुटी प्रकरणी जलदगती न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली.

नेपाळमध्ये आलेल्या प्रचंड पुरात बळींची संख्या १६० वर पोहोचली, पुरामध्ये १३३ भारतीयांसह ७५० पर्यटक बेपत्ता.

पत्रकारांच्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक: विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समिती सदस्यांशी साधला संवाद

महामंडळांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागांनी समन्वय साधावा – उपसभापती सचिन अहिर

सॉल्वेंट व धोकादायक केमिकल वापरासाठी परवानगी न घेतलेल्या उद्योगावर फौजदारी गुन्हा दाखल करा    – जिल्हाधिकारी अशोक काकडे