vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबईच्या महापौरपदी श्रीम.सुजाता पाटील व उपमहापौरपदी श्री.दशरथ भगत विराजमान…

नवी मुंबईच्या महापौरपदी श्रीम.सुजाता पाटील व उपमहापौरपदी श्री.दशरथ भगत विराजमान…

 

     नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर – उपमहापौरपदासाठी आज झालेल्या निवडणूकीत श्रीम. सुजाता सुरज पाटील यांची महापौरपदी तसेच श्री. दशरथ सिताराम भगत यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रणजित यादव यांनी पिठासन अधिकारी म्हणून जाहीर केले व त्यांचा अभिनंदनपर सत्कार केला. सभेच्या सुरवातीस महापालिका सचिव श्रीम.संघरत्ना खिल्लारे यांनी पीठासन अधिकारी यांचे स्वागत केले.

          महापौरपदासाठी दाखल झालेल्या अर्जातून नगरसेविका श्रीम. सरोज रोहिदास पाटील यांनी तसेच उपमहापौरपदासाठी दाखल झालेल्या अर्जातून नगरसेवक श्री. आकाश बाळकृष्ण मढवी यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महापौर पदावर श्रीम. सुजाता सुरज पाटील व उपमहापौर पदावर श्री. दशरथ सिताराम भगत बिनविरोध निवडून आले

   निवडणूकीनंतर महापौर व उपमहापौर पदाचे स्थानग्रहण केल्यानंतर प्रथमत: सभागृहाच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.         त्यानंतर मनोगत व्यक्त करतांना नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महापौर व उपमहापौर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.    महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील यांनी स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण व वाहतूक नियोजन हे आपले प्राधान्यक्रम राहतील असे सांगितले. तरुणांना संधी, महिलांची सुरक्षा व सन्मान, ज्येष्ठ नागरिकांचा आदर व सर्वसामान्य माणसांना अपेक्षित असणा-या सुविधा पुरविण्याचा आग्रही व प्रामाणिक प्रयत्न राहील असे त्या म्हणाल्या. वरिष्ठांनी सोपविलेली नवी मुंबईच्या महापौरपदाची संधी ही मोठी जबाबदारी मानून काम करणार असल्याचे सांगत सभागृहातील वरिष्ठ सदस्यांचे मार्गदर्शन व सर्व सदस्यांचे सहकार्य यातून शिस्तप्रिय काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपली महापौरपदी निवड ही महिलांच्या समाजातील प्रगतीशील वाटचालीची साक्ष असल्याचे सांगत गृहिणी ते नगरसेविका व महिला व बालकल्याण समितीची सभापती नंतर आता महापौरपदाची लाभलेली संधी याबद्दल आनंद व्यक्त करतांनाच नवी मुंबईच्या गतीमान व सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द राहण्याचे व संवेदनशीलपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

     उपमहापौर श्री. दशरथ भगत यांनी देशभरात नावलौकिक असणा-या नवी मुंबईच्या अधिक गतीमान विकासासाठी उपमहापौरपद ही एक मोठी संधी असून त्यासाठी अथक व प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सांगितले. आगामी काळात नवी मुंबईकर नागरिकांना अपेक्षित असे चांगले काम सर्वांना सोबत घेऊन केले जाईल असा निर्धार व्यक्त करीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांनी सर्व सहयोगी सदस्यांचे आभार मानले.

   याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे आणि इतर विभागाप्रमुख तसेच माजी खासदार श्री. संजीव नाईक, माजी आमदार श्री. संदीप नाईक आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर यांचे अभिनंदन केले.

0000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत “कृषिदिन व शेतकरी सत्कार समारंभ” उत्साहात संपन्न

बेलापूर पारसिक हिल येथे आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपणातून हरित नवी मुंबईची रूजवात…

राज्य दहशतवाद विरोधी पथकाची यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात २१ ठिकाणी शोधमोहिम, काहीजण चौकशीसाठी ताब्यात.

नवी मुंबई महानगरपालिकेची थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी ढोलताशे मोहीम**मालमत्ताकर थकबाकीदार नवी मुंबई महानगरपालिकेच्या रडारवर*  *३१ मार्च २०२५ पूर्वी कर भरण्याचे मालमत्ताकर थकबाकीदारांना आवाहन* 

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान-महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी…

vishwatmaklokswamivarta

नागरी भागातील बालाकांच्या सुपोषणासाठी नागरी बाल विकास केंद्र उपयुक्त- मंत्री आदिती तटकरे,सुपोषित मुंबई अभियान व नागरी बाल विकास केंद्र योजनेचा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta