vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-केंद्र शासनातर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठित ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार – २०२६ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना गौरवण्यासाठी केंद्र सरकारने पात्र बालकांकडून किंवा त्यांच्या वतीने संस्थांकडून नामनिर्देशन (Nominations) मागविले आहेत. यासाठी https://awards.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत.

राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या बालकांना प्रदान केला जातो.यात शौर्य,क्रीडा,समाजसेवा,विज्ञान आणि तंत्रज्ञान,पर्यावरण,कला आणि संस्कृती,नवोन्मेष (Innovation)याचा समावेश आहे.

अर्ज करण्यासाठी बालकाचे वय ५ वर्षांपेक्षा जास्त आणि ३१ जुलै २०२६ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी असावे. अर्ज केवळ*https://awards.gov.in* या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.स्वतः बालक, पालक, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश प्रशासन, जिल्हाधिकारी, पंचायती राज संस्था, नागरी स्वराज्य संस्था किंवा शैक्षणिक संस्था संबंधित बालकाचे नाव पुरस्कारासाठी सुचवू शकतात.ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३१ जुलै २०२६ ही आहे.जिल्ह्यातील ज्या बालकांनी शिक्षण, कला, क्रीडा किंवा सामाजिक कार्यात विशेष नैपुण्य मिळवले आहे, त्यांच्या पालकांना आणि संबंधित संस्थांना विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी संबंधितांनी वरील संकेतस्थळाला भेट द्यावी. असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, कोमल कोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांचाऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी घेतली आढावा बैठक*

एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

vishwatmaklokswamivarta

फाशीचा वड असणाऱ्या ठिकाणला राज्य स्मारक करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार…

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्राचे ‘स्टेट मन्युफॅक्चरिंग मिशन’ सुरू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’चे पुणे येथे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी पदासाठी पूर्वप्रशिक्षणाची संधी,पूर्वतयारीसाठी २५ एप्रिल रोजी मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन