vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी पदासाठी पूर्वप्रशिक्षणाची संधी,पूर्वतयारीसाठी २५ एप्रिल रोजी मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी पदासाठी पूर्वप्रशिक्षणाची संधी,पूर्वतयारीसाठी २५ एप्रिल रोजी मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन

अहिल्यानगर, द प्रतिनिधी-भारतीय सशस्त्र दलात अधिकारी पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ‘एसएसबी’ मुलाखतीची पूर्वतयारी करून घेता यावी, यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे दि. ४ ते २३ मे २०२६ या कालावधीत ‘एसएसबी कोर्स क्रमांक ६६’ आयोजित करण्यात आला आहे.या प्रशिक्षणासाठी निवडल्या जाणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना निवास व भोजनाची सोय विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी निवडीसाठी दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहिल्यानगर येथे मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे यांनी केले.

निवडीसाठी उमेदवारांनी मुलाखतीस येताना सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावरून ‘एसएसबी-६६’ कोर्सचा अर्ज डाउनलोड करून तो पूर्णपणे भरावा. तसेच अर्जाची प्रिंट व संबंधित मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

उमेदवाराने सीडीएसई-यूपीएससी किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व ते एसएसबी मुलाखतीसाठी पात्र असावेत. तसेच एनसीसी स्पेशल एंट्री, टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स किंवा विद्यापीठ प्रवेश योजना अंतर्गत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांकडे एसएसबीचे कॉल लेटर असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा training.pctcnashik@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा. तसेच ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ९१५६०७३३०६ वरही माहिती उपलब्ध आहे.

00000

संबंधित पोस्ट

गोरोबा काकांच्या अभंगात भक्ती व प्रेमाची अनुभूती : भास्करराव दानवे कुंभार समाज सामाजिक संस्थेतर्फे पुण्यतिथी साजरी

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका सादर करण्याकरिता 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

अभ्यासिका योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थ तस्करांवर कायद्याचा धाक यापुढेही कायम ठेवा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- 

चांदूर रेल्वे उपविभागात शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची मोहीम सुरू; ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पहलगाम, जम्मू & काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्याची माहिती महाराष्ट्रातील पर्यटक असण्याची शक्यता रायगड जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास  त्यांच्या मदतीकरिता संपर्क