vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई पोलिसांच्या अत्याधुनिक ‘प्रहारी’ इंटिग्रेटेड सीसीटीव्ही कमांड सेंटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

नवी मुंबई पोलिसांच्या अत्याधुनिक ‘प्रहारी’ इंटिग्रेटेड सीसीटीव्ही कमांड सेंटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

ठाणे, प्रतिनिधी):- नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज असलेल्या ‘प्रहारी’ इंटिग्रेटेड सीसीटीव्ही कमांड सेंटरचे (ICCC) सीबीडी बेलापूर येथील पोलीस आयुक्त कार्यालयात आज मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. या अत्याधुनिक कमांड सेंटरचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त सहकार्यातून साकारलेल्या या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे वनमंत्री श्री.गणेश नाईक व रोजगार हमी मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.भरत गोगावले यांची विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास विधानपरिषद सदस्य श्री. रविंद्र फाटक, विधानपरिषद सदस्य श्री. विक्रांत पाटील, विधानसभा सदस्य श्रीमती मंदाताई म्हात्रे, श्री.महेश बालदी, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, नवी मुंबईच्या महापौर श्रीमती सुजाता पाटील व पनवेलचे महापौर श्री.नितीन पाटील यांच्यासह विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. कैलास शिंदे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री.मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त श्री. दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. प्रमोद शेवाळे आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त श्री.मंगेश चितळे, मुंबई महानगरपालिकेचे मुख्य अभियंता श्री.शिरीष आरदवाड आदी मान्यवर उपस्थित होते

    ‘ऑलवेज वॉचिंग, ऑलवेज प्रोटेक्टिंग’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या ‘प्रहारी’ प्रणालीमुळे शहरातील प्रत्येक हालचालीवर चोवीस तास बारीक नजर ठेवली जाणार असून वाहतूक नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी हे केंद्र नवी मुंबई पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

000000000

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र #चौंडी येथे ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ या जलजागृती यात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानपरिषद सभापती सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

पंढरपूर कार्तिकी शुद्ध एकादशी सोहळा २ नोव्हेंबर २०२५ रोजी असून, या यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या यात्रा कालावधीत प्रशासनाने स्वच्छतेला प्राधान्य द्यावे-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ नागरिकांसाठी लाभदायी; एका छताखाली २३ शासकीय सेवा– उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर

२४ ते २५ एप्रिल दरम्यान वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’; नागरिकांनी सतर्क राहावे

शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा पहिला गट परदेशात रवाना

vishwatmaklokswamivarta