vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’अभियानात तीन दिवस विशेष मोहीम

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे’राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’अभियानात तीन दिवस विशेष मोहीम..

मुंबई, प्रतिनिधी – भटक्या, विमुक्त जमातींच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे व दाखले मिळावेत, यासाठी राज्यभरातील सुमारे 937 वस्त्यांमध्ये विशेष वस्ती शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत ही शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. मंत्रालयातील त्यांच्या दालनात भटक्या, विमुक्त समाजाच्या समस्यांबाबत विशेष बैठक झाली. त्यावेळी महसूलमंत्र्यांनी हे आदेश दिले. या बैठकीला भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ हे अभियान राबविले जाणार आहे. या पंधरवड्यात सलग तीन दिवस हे भटके विमुक्त समाजासाठी विशेषत्वाने राखीव ठेवण्यात आले आहेत. या तीन दिवसांत प्रशासनाने त्यांच्या वस्तीवर जाऊन काम करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या संपूर्ण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाकडून लवकरच एक नवीन शासन निर्णय काढण्यात येणार आहे. या शासन निर्णयाच्या आधारे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांचा कृती आणि नियोजन आराखडा त्वरित तयार करून तयारीला लागावे, असे आदेश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.

 

०००००

संबंधित पोस्ट

अतिवृष्टी अनुदान वितरणात सुलभता येण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी,आवश्यक; शनिवार(दि.८), रविवार(दि.९) प्रत्येक गावात विशेष कॅम्प

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -मुख्यमंत्र्यांनी आखलाय 100 दिवसांसाठी 7 कलमी कृती आराखडा,प्रशासनाला मिळतोय शिस्तीचा धडा…!

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी: फळबाग लागवडीसाठी शासनाच्या विविध योजना

मोताळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला प्रशिक्षणार्थीना टूलकिट वाटप

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

खरीप हंगामासाठी सर्वंकष नियोजन करावे – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील कृषी सेवा केंद्रांवर साठा व दर दर्शविणारे फलक अनिवार्य.राहाता तालुक्याची खरीप पूर्व हंगाम नियोजन बैठक संपन्न