vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी: फळबाग लागवडीसाठी शासनाच्या विविध योजना

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी: फळबाग लागवडीसाठी शासनाच्या विविध योजना

बुलढाणा, प्रतिनिधी :बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवड आणि शाश्वत सिंचनासाठी शासनामार्फत विविध योजनेंतर्गत संधी उपलब्ध झाली आहे. आधुनिक शेतीकडे वाटचाल करत शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी जिल्ह्यातील हवामान व मातीचे पोत फळबाग लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांनी कृषी संबधित शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनांअंतर्गत अनुदानावर आधारित फळबाग लागवड योजनाचा शेतकऱ्यांनी अर्ज करुन लाभ घ्यावा.

लागवडीसाठी योग्य पिके:  फळपिके- आंबा, काजु, चिकु, पेरु,डाळिंब,संत्रा,मोसंबी,कागदी लिंबु, नारळ, बोर, सिताफळ, आवळा,चिंच, कवठ,जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, सुपारी, बांबु, शेवगा, हदगा,केळी(3 वर्ष), ड्रॅगनफ्रुट, ॲव्हाकॅडो, द्राक्ष, चंदन, तुती, करवंद,खजुर, हनुमान फळ.फुलझाडे- गुलाब, मोगरा, निशीगंध, सोनचाफा.औषधी वनस्पती- पानपिंपरी,अर्जुन, असान, अशोका, बेहडा, हिरडा, बेल,टेटु,डिकेमाली, रक्तचंदन.

मसाल्याची पिके- लवंग,दालचिनी मिरी,जायफळ,हळद.मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे   मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना नोव्हेंबर 2022 पासून राज्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्याच्या विविध भागात पावसाची अनिश्चितता व अनुपलब्धता यामुळे सिंचना अभावी पीक उत्पादन मोठ्या प्रमाणात घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करणे हा एक उत्तम पर्याय आहे. शेततळ्यामुळे पिक व फळबागेला सुरक्षित सिंचन उपलब्ध होऊ शकते.

लाभार्थ्यांसाठी पात्रता : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : मग्रारोहयो अंतर्गत लागवडीसाठी जॉबकार्ड असणे आवश्यक, मग्रारोहयो अंतर्गत लागवडीसाठी कमीत कमी 0.05 हेक्टर व जास्तीत जास्त 2.0 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यास लाभ देण्यात येतो. स्वत:च्या नावे 7/12 व संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र, कुळाच्या नावे असल्यास कुळाचे संमतीपत्र, परंपरागत वन निवासी अधिनियमानुसार वनपट्टेधारक शेतकरी, किमान 10 गुंठे जमीन आवश्यक. अल्प/अत्यल्प उत्पन्न, महिला, दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य, मग्रारोहयो अंतर्गत लागवडीसाठी ग्रामसभेत मंजुरी घेणे आवश्यक आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवड करतात पात्र ठरू शकत नाहीत, असे शेतकरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लाभ घेऊ शकतो. योजनेंतर्गत लागवडीसाठी कमीत कमी 0.20 हेक्टर व जास्तीत जास्त 6.0 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यास लाभ देण्यात येतो.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना : सर्वसाधारण क्षेत्रासाठी 40 टक्के, अनुसुचित क्षेत्रासाठी 50 टक्के 2 हप्त्यांमध्ये 60:40 प्रमाणे, दुसऱ्या वर्षी 80 टक्के झाडे जिवंत असावीत क्षेत्रमर्यादा 2 हेक्टरपर्यत, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याकरीता किमान 0.40 हेक्टर क्षेत्र जमीन असणे आवश्यक आहे.

अर्ज कुठे करावा: मग्रारोहया योजनेच्या लाभासाठी ग्रामपंचायात येथे अर्ज सादर करुन त्याची ग्रामसभेमध्ये मान्यतेने लाभार्थीची निवड होते. लाभार्थ्यांनी अर्ज कृषि सहायक यांच्याकडे करावा. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळेचा अर्ज महाडीबीटी पोर्टलवर किंवा https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर सीएससी केंद्रामार्फत किंवा वैयक्तिकरित्या ऑनलाईन अर्ज करावा.

000000

संबंधित पोस्ट

फलटण शहरातील मलटण परिसराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे वाहून गेली होती परंतु फलटण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचारी यांनी शर्तीने 24 तासांमध्ये सदरची पाईपलाईन दुरुस्त करून सर्व शहराचा पाणीपुरवठा चालू केला

महाराष्ट्र सरकारचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गॅलक्सी रूग्णालयात जावून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट 

vishwatmaklokswamivarta

राज्यात ठीक ठिकाणी पावसाच्या सरी सुरूच आहे#रायगड आज सकाळी ०६:०० वाजता जारी मध्यम वज्रवृष्टी व धक्क्याने वारे ४१-६१ किमी/तास जोरदार पाऊस > १५ मिमी/तास वैध वेळ: ०९:०० वाजेपर्यंत कृपया सावध रहा व सुरक्षित रहा!

vishwatmaklokswamivarta

सामाजिक समता सप्ताह उत्साहात-स्वाधार व ट्रॅक्टर योजनेच्या लाभार्थ्यांना पत्राचे वाटप

माझी मनपा सेल्फी” उपक्रमाने मतदारांना घातली भुरळ-अहिल्यानगर मनपा स्वीप समितीच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण ‘वोट सेल्फी पॉईंट्स’चे प्रदर्शन-हजारो मतदान कर्मचाऱ्यांनी काढले सेल्फी

vishwatmaklokswamivarta

लातुरात महा विधी सेवा शिबीर, शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद,कायदेविषयक मदतीसोबतच शासनाच्या योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी न्याय संस्था प्रयत्नशील-न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर• विविध शासकीय योजनांचे वितरण; जनजजागृती चित्ररथाला हिरवी झेंडी• विविध योजनांविषयी भव्य प्रदर्शनी; लातूरकरांनी नोंदविला सहभाग