vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

30 मे ते 6 जून कालावधीत महिला सुरक्षेततेविषयी नवी मुंबईत पथनाट्यातून जनजागृतीचा अभिनव उपक्रम…

30 मे ते 6 जून कालावधीत महिला सुरक्षेततेविषयी नवी मुंबईत पथनाट्यातून जनजागृतीचा अभिनव उपक्रम…

 

         नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांचे सातत्यपूर्ण आयोजन करण्यात येत असते. अशाच प्रकारचा महिला सुरक्षिततेविषयीचा एक अभिनव उपक्रम महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून पथनाटयासारख्या प्रभावी माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

    याकरिता दि. 30 मे ते 6 जून या कालावधीत महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रात वर्दळीच्या प्रत्येकी 5 ठिकाणी श्रावस्ती नाट्यसंस्थेचे कलावंत पथनाट्यातून महिला सुरक्षिततेविषयी जनजागृती करणार आहेत.  यामध्ये 30 मे रोजी – दिघा विभागात (1) हिंदमाता विद्यालयासमोर, (2) विष्णूनगर नाका, (3) इलठणपाडा दिघा विहिरीजवळ, (4) ईश्वर नगरमध्ये सिध्दीविनायक मंदिराजवळ, (5) रामनगरमध्ये नमुंमपा शौचालयाजवळ तसेच घणसोली विभागात (1) दगडू चाहू पाटील चौक – घणसोलीगाव, (2) डि – मार्टजवळ, (3) हावरे चौक, (4) भिमनगर- रबाळे व (5) नोसिल नाका अशा प्रकारे पथनाट्ये सादर होणार आहेत.31 मे रोजी वाशी विभागात – (1) से. 9, मिनी मार्केट फूटपाथ, वारणा डेअरीच्या समोर, (2) जुहूगांव, नमुंमपा शाळा क्रं. 27 समोरील परिसर, (3) वाशीगांव, मच्छी मार्केट प्रेमानाथ चौक, (4) से. 6/7, जनता मार्केटच्या समोरील परिसर व (5) से. 9अ, नूर मस्जिदच्या शेजारील परिसर याठिकाणी पथनाट्ये सादर होतील.        2 जून रोजी तुर्भे विभागात (1) इंदिरानगर समाजमंदिर, (2) तुर्भे स्टोअर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, (3) कोपरीगाव, स्मशानभूमी, भाजी मार्केटजवळ, (4) बँक ऑफ इंडिया, से, 24, तुर्भे हनुमान मंदिराजवळ, (5) सानपाडा स्टेशन खामगल्ली येथे पथनाट्ये सादर होतील.

 3 जून रोजी कोपरखैरणे विभागामध्ये – (1) से. 15 गुलाब सन्स डेअरीजवळ, (2) कोपरखैरणे रेल्वे स्टेशनजवळ से. 6, (3) बोनकोडे पाण्याच्या टाकीशेजारी, (4) श्रमिक नगर झोपडपट्टी सार्वजनिक नळासमोर (समाजमंदिर) आणि (5) कोपरखैरणे से. 1 ते 4 मैदान याठिकाणी पथनाट्य सादरीकरण होईल.

 4 जून रोजी नेरूळ विभागात – (1) विद्याभवन शाळेजवळ, से. 18, नेरुळ, (2) बांचोली मैदान, से. 20, नेरुळ, (3) सहकार बाजार, से. 6, नेरुळ, (4) नेरुळ रेल्वे स्टेशनसमोर, (5) नेरुळ. से. 8, ग्रंथालयासमोरील मैदान येथे पथनाट्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.

    5 जून रोजी बेलापूर विभागात – (1) करावेगांव, तलाव बस स्टॉपजवळ, (2) दारावेगांव, नागेश्वर तलावाजवळ (सर्कल), (3) दिवाळेगांव , मच्छी मार्केटजवळ, (4) रमाबाई आंबेडकर नगर से. 8 सी.बी.डी. आणि (5) बेलापूरगांव तलावाजवळ पथनाट्ये सादर होणार आहेत.        6 जून रोजी ऐरोली विभागात – (1) ऐरोली रेल्वे स्टेशन ( डेपोसमोर ) से. 3, (2) ऐरोली से. 5 चिंचोली गार्डन, (3) चिंचपाडा – साईबाबा मंदिराजवळ, (4) ऐरोली नाका – तलावाजवळ आणि (5) ऐरोली गाव मराठी शाळेजवळ पथनाट्य सादरीकरण होणार आहे.तरी नागरिकांनी व विशेषत्वाने महिलांनी आपल्या विभागात सकाळी 10 ते 11 आणि सायं. 5 ते 7 या वेळेत सादर होणा-या पथनाट्यांच्या ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन समाजविकास विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

संवेदनशील धारावी पोलीस ठाण्याला आयएसओ मिळाल्याबद्दल कार्यकर्त्याकडून सन्मान..

जिल्ह्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

राजकारणापेक्षा माझ्यासाठी समाजकारण महत्त्वाचे-दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे

vishwatmaklokswamivarta

जयऱ्या आत्मचरित्र पुस्तकाचे नामदार श्री सुशील कुमारजी शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन..

vishwatmaklokswamivarta

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय-बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी उमेद अभियान वचनबध्द- मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर,महालक्ष्मी ट्रेड सरस मध्ये कोट्यावधींची उलाढाल..

vishwatmaklokswamivarta