vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मोताळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला प्रशिक्षणार्थीना टूलकिट वाटप

मोताळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला प्रशिक्षणार्थीना टूलकिट वाटप

 

बुलडाणा, प्रतिनिधी : मोताळा येथील सेवागिरी बाबा शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे नांदी फाउंडेशनमार्फत महिलांना विविध व्यवसायातील प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये उत्तीर्ण झालेल्या महिला प्रशिक्षणार्थीना नांदी फाउंडेशनव्दारे टूलकिट व प्रमाणपत्राचे वाटप दि. 12 मार्च रोजी करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्राचार्य एस. डी. गंगावणे, नांदी फाउंडेशनचे प्रतिनिधी रजत वरादे व संस्थेतील सर्व कर्मचारी वृंद तथा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

नांदी फाउंडेशनव्दारे कोपा, ड्रेसमेकिंग, संधाता, नळ कारागीर, जोडारी, तारतंत्री, आयसीटीएसएम, कॉस्मेटोलॉजी या विविध व्यवसायातील प्रशिक्षणार्थी(मुली) यांना व्यवसाय निहाय सैध्दांतिक व प्रात्यक्षिक तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. तसेच संस्थेतील कॉस्मेटोलॉजी व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या व प्रशिक्षण उत्तीर्ण केलेल्या आजीमाजी महिला प्रशिक्षणार्थीना ब्युटी फॉर बेटर लाइफ हे दहा दिवसाचे मोफत प्रशिक्षण दोन सत्रामध्ये देण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

आजची मोठी बातमी – महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करू इच्छिणाऱ्या इतर राज्यांतील नोंदणीकृत डॉक्टरांसाठी मोठा दिलासा- तात्काळ नोंदणी करून आरोग्य सेवा करण्यास परवानगी

कोयनानगर एमटीडीसी रिसॉर्टचा होणार कायापालटकोयना परिसर पर्यटनाचे हब होणार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई..

दशसूत्री उपक्रमांतर्गत जिल्ह्यात एकाच वेळी १९२० शाळांमध्ये पालक सभा चांगले नागरिक घडविण्यासाठी संस्कार आवश्यक-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

सैलानी उत्सवासाठी वाहतुकीत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे मार्ग वळविण्याचे आदेश…

बाल हक्क संदर्भात 21 नोव्हेंबर रोजी एक दिवसीय परिषदेचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

पहलगाम दहशतवादी हल्ला-राज्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांची मदत वितरीत..