vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बाल हक्क संदर्भात 21 नोव्हेंबर रोजी एक दिवसीय परिषदेचे आयोजन*

*बाल हक्क संदर्भात 21 नोव्हेंबर रोजी एक दिवसीय परिषदेचे आयोजन*

सातारा, प्रतिनिधी: राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग यांनी सातारा जिल्ह्यामध्ये बालकांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी, क्षमता निर्माण करण्यासाठी व बालकांशी संबंधित विविध भागधारकांसोबत संवाद साधण्यासाठी बाल हक्क संदर्भातील विषयाच्या चर्चेसाठी हॉटेल लेक व्यू, रहिमतपूर रोड, गोडोली, सातारा याठिकाणी शुक्रवार दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली आहे.

या परिषदेमध्ये शाळांमध्ये शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळाला प्रतिबंध, शारीरिक शिक्षा आणि त्याचे लपलेले व्रणः शाळांमध्ये मुलांचे मानसिक आरोग्य जपणे तसेच बाल न्याय आधिनियम (मुलांची काळजी व संरक्षण) 2015, लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा 2012 या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या समस्या या विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केलेले आहे.

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग यांनी या परिषदेसाठी बालकांशी संबंधित असलेले जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्या अंतर्गत येणारे सरकारी व खाजगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघटना, जिल्हा बाल संरक्षण यूनिट, मानव तस्करी विरोधी यूनिट बाल कल्याण पोलिस अधिकारी, जिल्हा शिक्षण व उद्योग प्रशिक्षण संस्था चे प्राध्यापक, विशेष बाल पोलीस पथक, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, बाल कल्याण समितीचे सदस्य, जिल्हा कृती दल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे प्रतिनिधी इत्यादी प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित राहणार आहेत.

0000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta

जालन्यात मोकाट कुत्रे व नागरी समस्यावर शिवसेना आक्रमक जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात उग्र आंदोलनभवानीनगर येथे मोकाट कुत्र्यांनी तोडले चिमुकल्याचे लचके..

vishwatmaklokswamivarta

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विकास कामे होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही…

कुणबी प्रमाणपत्रांसाठी हिंगोली जिल्ह्यातील ४० महसूल मंडळांत विशेष शिबिरे १० ते १७ सप्टेंबरदरम्यान आयोजन; १३ हजार ७१३ अर्जांपैकी १३ हजार ७०७ मंजूर

vishwatmaklokswamivarta

घाणेवाडी तलावाच्या पूर्णतः क्षतीग्रस्त सांडव्याची तातडीने दुरुस्ती करावी- संजय लाखेपाटील यांनी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे केली मागणी

काँग्रेसने संसदेच्या प्रतिष्ठेचा अवमान केल्याने जालन्यात भाजप आक्रमक, जोरदार निषेध आंदोलन संसदेचा अवमान हा देशाचा अपमान – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे