vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पहलगाम दहशतवादी हल्ला-राज्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांची मदत वितरीत..

पहलगाम दहशतवादी हल्ला-राज्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांची मदत वितरीत..

मुंबई, प्रतिनिधी- जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सहा नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची आर्थिक मदत वितरित करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या राज्यातील नागरिकांच्या कुटुंबियांना सुरवातीस 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, नंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मदत रक्कम वाढवून प्रत्येकी 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार मदत व पुनर्वसन विभागाने मृतांच्या कुटुंबियांना ही आर्थिक मदत वितरित केली.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून मिळालेली ही मदत ही अशा कठीण काळात कुटुंबीयांना थोडा आधार देणारी आहे, अशी भावनाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केली.

000000

संबंधित पोस्ट

भारत महान प्रजासत्ताक राष्ट्र – पालकमंत्री मेघना बोर्डीकर प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta

भारतीय तटरक्षक दलाने जीएसएलच्या नवीन पिढीच्या ‘अमूल्य’ फास्ट पेट्रोल व्हेसलला सेवेत दाखल

vishwatmaklokswamivarta

नीट युजी 2026 परीक्षा २१ जून रोजी पार पडणार असून, परीक्षा निष्पक्ष, सुरक्षित आणि सुरळीत वातावरणात घेण्यासाठी सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे.

भारत – पोर्तुगाल पुनर्प्रस्थापित राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण महाराष्ट्रासोबत सहकार्य वाढविण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक- राजदूत जोओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी अल्मेडा

पोलिस भरतीमध्ये जालना येथील स्व.भूदेवी किशनराव गोरंट्याल क्रीडा प्रबोधिनी मधील विद्यार्थ्यांची निवड

नवी मुंबई, नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील विमानतळांच्या विकास कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा