vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

बुलढाणा, प्रतिनिधी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात आले असून, आज सकाळी पारंपरिक पद्धतीने जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पंचामृताने अभिषेक करण्यात आला. तसेच एका बालकाला संभाजी महाराजांच्या रूपात पाळण्यात ठेवून सुवासिनींनी पाळणागीत गायले व त्याचे ‘संभाजी राजे’ असे नामकरण करण्यात आले.यानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी स्मारकातील पुतळ्यास पुष्पमाल्य अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड, नगर परिषदेचे गटनेते मृत्युजय गायकवाड, ओमसिंग राजपूत, सोनू जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी त्वरीत करावी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 मतदान केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी…

vishwatmaklokswamivarta

राज्यात पहिले महापुराभिलेख भवन उभारणार- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार

अमृत’ लक्ष्यीत गटातील उमेदवारांसाठी दि.३ पासून आयात-निर्यात प्रशिक्षण

अखिल भारतीय धर्मसंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ संपन्न !प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात समस्त संत-महंतांची ,भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची एकमुखी मागणी !

vishwatmaklokswamivarta