vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

अमृत’ लक्ष्यीत गटातील उमेदवारांसाठी दि.३ पासून आयात-निर्यात प्रशिक्षण

अमृत’ लक्ष्यीत गटातील उमेदवारांसाठी दि.३ पासून आयात-निर्यात प्रशिक्षण

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (‘अमृत’) पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील अमृत लक्ष्यीत गटातील उमेदवारांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी एक उमेदवार याप्रमाणे आयात निर्यात या विषयावर मोफत प्रशिक्षणाचे आयोजन शुक्रवार दि.३ जानेवारी २०२५ रोजी करण्यात येत आहे.

  तालुका निहाय व्यक्ती यांना आयात निर्यात या विषयावर मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे ह्या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय कसा भरावा, बाजारपेठ पाहणी, व्यवसायाचे व्यवस्थापन, बाजार सर्वेक्षण साधने आणि तंत्र, प्रकल्प अहवाल, युनिट चे व्यवस्थापन, यशस्वी उद्योजका बरोबर संवाद, उद्योगांला भेट तसेच आयात-निर्यात करताना येणाऱ्या समस्याचे निराकरण, भारताचे परकीय धोरण, व्यापाराची तंत्रे, विविध क्षेत्रात निर्यातीच्या संधी, आयात निर्यात प्रक्रिया काय आहे यासंबंधी तज्ञ व्याख्यात्या कडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

  तांत्रिक अभ्यासक्रमात निर्यात म्हणजे काय व निर्यात प्रक्रिया परकीय धोरणांचा आढावा २०१५-२० आणि २०२०-२५ आयात देशातील साप्ताहिक वस्तूंचे दर शोधणे, विश्वासार्ह खरेदीदार कसे शोधावे व निर्यातीवरील इसीओ टर्म्स पॅक हाऊस, मानक कार्य व्यवस्थापन, हवाई आणि समुद्री वाहतुकीचे उत्पादनाचे पॅकिंग, कस्टम प्रक्रिया दस्ताऐवजी करण,गुणवत्ता व्यवस्थापन व प्रमाणपत्र एफइएमए (FEMA) च्या भूमिकेचा अभ्यास, APEDA ची भूमिका व निर्यातदारासाठी अनुदाने, (DGFT) ची भूमिका व निर्यात कंपनी तयार करणे (IEC), इसीजीसी ची भूमिका व पेमेंट रिस्क व्यवस्थापन,निर्यातीची बिल तयार करण्याची प्रक्रिया, किंमत ठरवण्याच्या पद्धती व नफा वाढवणे ह्या बाबीवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी पास, पदवी व तांत्रिक शिक्षण यांना प्राधान्य दिल्या जाईल. जातीचा उल्लेख असलेला कोणताही शासकीय कागदपत्राचा पुरावा, अंतिम शिक्षणाची मार्कलिस्ट देणे आवश्यक राहील,शाळा सोडल्याचा दाखला, महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असल्याचे प्रमाणपत्र तहसीलदार यांचे असावे प्रवेश अर्ज व वरील कागदपत्र संबंधित एमसीईडी कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.तसेच आधार कार्ड व पॅन कार्ड आवश्यक,यासाठी ‘अमृत’ लक्ष्यीत गटातील उमेदवारांसाठी प्रशिक्षण यासाठी वयोमर्यादा २१ ते ५० वर्षे असून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला, विवाहित असल्यास गॅझेट/ विवाह प्रमाणपत्र / पॅनकार्डची प्रत आणि प्रत्येक तालुक्यातील उमेदवारांच्या अर्जांना प्राधान्य देऊन निवड करण्यात येईल. या प्रशिक्षणात जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी केले आहे. अधिक माहिती व संपर्कासाठी, जिल्हा प्रकल्प समन्वयक एमसीईडी प्रतिभा निमकर व कार्यक्रम समन्वयक आशा कुरवाडे(७८८८०७०४१९), यांच्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,अ-३८ एमआयडीसी एरिया, रेल्वे स्टेशन जवळ छ.संभाजीनगर येथे संपर्क करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.०००००

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सक्षम – मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

घरकुलाच्या मागणीसाठी दिव्यांगांचा-महानगरपालिकेवर धडक मोर्चा  

नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या 23 कोटी 26 लक्ष रुपयांच्‍या अर्थसंकल्‍पास मंजूरी;सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षण व आरोग्यातून गावांचा सर्वांगीण विकास..

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिम आणि घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 संदर्भातील राष्ट्रीय जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

राज्यात नागपूरसह राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भातील काही भागात तीव्र उष्णता कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला 

हवामान विभागानं -पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट