vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ऐतिहासिक घटना: भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म

ऐतिहासिक घटना: भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म

नवी दिल्ली प्रतिनिधी-

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत एक मोठी आणि ऐतिहासिक घटना जाहीर केली आहे.

एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट करताना त्यांनी सांगितले की मुखी या भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता, जिचे वय 2 वर्षे 9 महिने आहे तिने 5 शावकांना जन्म दिला आहे. भारताच्या ‘चित्ता पुनर्वसन प्रकल्पामधील हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.

यादव यांनी सांगितलं की अलीकडच्या इतिहासात भारतात जन्मलेल्या चित्ता मादीने यशस्वीरीत्या शावकांना जन्म देण्याची ही पहिलीच घटना आहे. चित्त्यांची भारतीय वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता, आरोग्य आणि दीर्घकालीन अस्तित्वाची मजबूत शक्यता ही घटना दर्शवते.

यादव म्हणाले,“ही घटना भारतात टिकून राहणाऱ्या आणि जनुकीयदृष्ट्या वैविध्य असलेल्या चित्यांची संख्या वाढण्याची शक्यता अधिक बळकट करते.त्यांनी पुढे सांगितलं की मुखी आणि तिची सर्व शावके व्यवस्थित आहेत.

यादव यांनी समाधान व्यक्त करत सांगितलं की या यशामुळे भारताचे सध्याचे संवर्धन प्रयत्न आणि प्रोजेक्ट चित्ताचा पुढचा मार्ग आणखी आशादायी दिसत आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान;गांधेली येथे वृक्ष लागवड कामांची पाहणी

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रिया १५ मे पर्यंत पूर्ण करा- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय आढावा

बालमहोत्सवातून मुला – मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना- मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे-तीनदिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव दिमाखात सुरू

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025**सभापती आरक्षण सोडतीसाठी*विशेष सभा आयोजित*

उद्योजकता विकास व प्रेरणादायी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

vishwatmaklokswamivarta