vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्याला अलर्ट आज यलो अलर्ट जारी ..

जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्याला अलर्ट आज यलो अलर्ट जारी ..

 

जालना, प्रतिनिधी : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात काल. आज. 12 एप्रिल, 2025 रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी खालीलप्रमाणे दक्षता घेणेचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नागरिकांनी मेघगर्जनेच्या खेळी, बोजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्यूत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्यूतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या/लोंबणाऱ्या तारांपासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीत-कमी संपर्क ठेवावा. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीजापासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 या क्रमांकावर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा, असे अवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन गणेश महाडिक यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचण्या विशिष्ट ठिकाणी करण्याची सक्ती नाही- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

फलटण येथे पालखी सोहळ्यात ‘संवाद वारी’ प्रदर्शनास वारकऱ्यांचा प्रतिसाद

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप  विमा भरण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ..

अहिल्यानगरच्या गणेश ढवणचा उपराष्ट्रपतींकडून गौरव संसदीय कार्यपद्धती संशोधनात विशेष कामगिरी

vishwatmaklokswamivarta

मराठी न शिकविणाऱ्या शाळांवर दंडासह मान्यता रद्द करण्याची कारवाई- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना आज दिनांक ०७ जुलै २०२५ रोजी सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta