vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पदयात्रेचे आयोजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पदयात्रेचे आयोजन

 

जालना, प्रतिनिधी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 व्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासन, सर्व शैक्षणिक संस्था, एनएसएस, एनसीसी, एनवायके व इतर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जयभिम पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

जालना शहरात देखील जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र, जिल्हा परिषद, विविध क्रीडा संघटना, मंडळे यांच्या विद्यमाने दि. 13 एप्रिल, 2025 सकाळी 07.30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा (नुतन वसाहत) येथे माळा अर्पण करून पदयात्रेची सुरुवात होणार आहे. ही पदयात्रा शनि मंदीर – गांधी चमन- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (मस्तगड) यांच्या पुतळ्यास माळा अर्पण करून पुर्ण होणार आहे. या पदयात्रेस जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती राहणार आहे.

जिल्ह्यातील शाळा/महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांसह, एनएसएस, एनसीसी, स्काऊट/गाईडस विद्यार्थी तसेच सर्व क्रीडा संघटना पदाधिकारी व खेळाडू यांनी पदयात्रेत मोठया संख्येने सहभागी व्हावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, जालना यांचेवतीने करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

करंजा मत्स्य बंदर प्रकल्प कामांसाठी अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर करावा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• ४,५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता• दुसऱ्या टप्प्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीस मिळणार गती..

फायबर ग्लास बोटींच्या माध्यमातून आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- 25 फायबर ग्लास बोटींचे लोकार्पण..

vishwatmaklokswamivarta

उन्हाळी क्रीडा कौशल्य प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन जास्तीत जास्त खेळाडूंनी शिबिरात सहभाग घ्यावा

जालना जिल्ह्यात रेड अलर्ट; सात हजाराहून अधिक नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले ; बाधित लोकांना अन्न धान्यासह जेवणाचीही केली सोयपालकमंत्री ना. पंकजाताई मुंडेंनी कलेक्टर व प्रशासनाचे केले अभिनंदन; जिल्ह्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष

vishwatmaklokswamivarta

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात ‘बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ उपक्रम राबविणार – मंत्री आदिती तटकरे बालकांचे आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि हक्कांवर विशेष भर

श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले

vishwatmaklokswamivarta