vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

परिवहन संवर्गातील वाहनांकरिता 23 जूनपासून नवीन मालिका..

परिवहन संवर्गातील वाहनांकरिता 23 जूनपासून नवीन मालिका..

        सांगली, प्रतिनिधी: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली करिता नव्याने नोंदणी होणाऱ्या परिवहन संवर्गातील वाहनांकरीता एम एच १० ई क्यू ही नवीन मालिका सोमवार, दिनांक 23 जून 2025 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

     एम एच १० ई क्यू या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनांकरीता आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटर वाहन नियमाच्या ५ (अ) मध्ये विहीत केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत, ई-मेल आयडी आवश्यक आहे. पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन ४.० या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून त्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहीत शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवार, दिनांक 24 जून 2025 दुपारी ४ वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेचा डीडी जो अर्जदार सादर करेल त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी 180 दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

०००००००

संबंधित पोस्ट

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) तर्फे जाफ्राबाद येथे मोफत गारमेंट मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळेत सन २०२६-२७ साठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर

उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन; मार्गदर्शक सूचना जारी

किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत धानखरेदीदार संस्थांमार्फत 46 खरेदी केंद्रावर धानाची (भाताची) खरेदी करता येणार

vishwatmaklokswamivarta