vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) तर्फे जाफ्राबाद येथे मोफत गारमेंट मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) तर्फे जाफ्राबाद येथे मोफत गारमेंट मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

 

जालना, प्रतिनिधी): महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र, जालना पुरस्कृत सर्वसाधारण प्रवर्गातील युवक-युवतींकरिता सन 2026-27 अंतर्गत मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जाफ्राबाद येथे करण्यात आले आहे. लाभार्थीनी उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वतःचा स्वंयरोजगार निर्माण करावा हा कार्यक्रम आयोजनाचा मुख्य उद्देश असल्याने सर्व प्रकारचे गारमेंट तयार करणे प्रशिक्षण कार्यक्रमावर – 1 महिना कालावधीच्या या प्रशिक्षणा कार्यक्रमामध्ये ड्रेस डिझायनिंग, बॉर्डर वर्क, ब्लाऊजचे विविध प्रकार, त्यावर डिझायनिंग, चुडीदार, फ्रॉक, फ्लेअर्ड फ्रॉक, बेबी फ्रॉक, साधा फ्रॉक, स्कर्ट इ. इत्यादीचे प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तसेच उद्योजकता विकास प्रशिक्षण, या मध्ये उद्योजकिय गुण संपदा, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकासासाठी सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, बाजारपेठ, पाहणीतंत्र व तंत्र विपणन व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, कर्ज योजना व कर्ज प्रकरणे व्यवस्थापन व विक्री कौशल्य लघु उद्योग विषयक कायदे, शासकीय धोरणे, अकाउंटस, लघु उद्योजकाचे व्यवस्थापन, बँकेचे व्यवहार इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. सदरील कार्यक्रम हा संपुर्णतः मोफत असुन यासाठी लाभार्थी किमान 7 वी पास, वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष पात्रता धारक इच्छुक लाभार्थीना प्रवेश व अधिक माहितीसाठी वैभव मोकळे मो. 9689317953 कार्यक्रम आयोजक यांच्याशी किंवा श्री. विनोद तुपे प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना द्वारा-मराठा पार्क बिल्डिंग, विशाल कॉर्नर, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) चौफुली, जालना. फोन.नं.02482-220592 येथे दि. 12 जुन, 2026 पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिऊके, योगेश सारणीकर, व विभागीय अधिकारी सुदाम थोटे, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

****

संबंधित पोस्ट

हातमाग कापड स्पर्धेसाठी प्रवेशिका मागविल्या

vishwatmaklokswamivarta

जिल्हा रुग्णालयात नर्सिंग पदवी अभ्यासक्रमास मंजुरी

इंडो जर्मन टुल रुम आणि अमृतचा विशेष उपक्रम  खुल्या वर्गातील तरुणांना व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षण 

रितसर परवानगी घेऊनच जाहिराती प्रसिध्दीचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

नवीन 4 कामगार संहितांवर हरकती-सूचना सादर करण्याचे आवाहन

सातारा जिल्ह्यात रोजगाराची संधी: मेळाव्यांतून ७७६ तरुणांना दिलासा;मुख्यमंत्री युवा कार्य’ योजनेचाही मोठा टप्पा

vishwatmaklokswamivarta