vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), तर्फेबदनापूर येथे मोफत ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), तर्फेबदनापूर येथे मोफत ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

जालना,द प्रतिनिधी): महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र, जालना पुरस्कृत सर्वसाधारण प्रवर्गातील युवक-युवतींकरिता सन 2026-27 अंतर्गत मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन बदनापुर येथे करण्यात आले आहे. लाभार्थीनी उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वतःचा स्वंयरोजगार निर्माण करावा हा कार्यक्रम आयोजनाचा मुख्य उद्देश असल्याने ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमावर-मोत्यापासून चावीचे किचन, कुंदन पासून नेकलस तयार करणे, कुंदन पासून देवदास नेकलेस तयार करणे, तन्मनी मोत्याचा सेट तयार करणे मोत्याच्या बांगडया, बिंदी, कानातले, तन्मनी मोत्याचा सेट तयार करणे विविध डिझाईनचे मंगळसूत्र तयार करणे कुंदन, मोती पासून राख्या ब्रेसलेट कुंदन, मोत्यापासून लटकन तयार करणे इत्यादीचे प्रात्याक्षिकद्वारे सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तसेच उद्योजकता विकास प्रशिक्षण, या मध्ये उद्योजकिय गुण संपदा, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकासासाठी सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, बाजारपेठ, पाहणीतंत्र व तंत्र विपणन व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, कर्ज योजना व कर्ज प्रकरणे व्यवस्थापन व विक्री कौशल्य लघु उद्योग विषयक कायदे, शासकीय धोरणे, अकाउंटस, लघु उद्योजकाचे व्यवस्थापन, बँकेचे व्यवहार इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. सदरील कार्यक्रम हा संपुर्णतः मोफत असुन यासाठी लाभार्थी किमान 7 वी पास, वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष पात्रता धारक इच्छुक लाभार्थ्यांना प्रवेश व अधिक माहितीसाठी श्री. शिलवंत दिलीप मो. 8087283065 कार्यक्रम आयोजक यांच्याशी किंवा श्री. विनोद तुपे प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना द्वारा-मराठा पार्क बिल्डिंग, विशाल कॉर्नर, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) चौफुली, जालना. फोन.नं.02482-220592 येथे दि.12 जुन, 2026 पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिऊके, योगेश सारणीकर, व विभागीय अधिकारी सुदाम थोटे, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा जिल्हा दौरा

वाढवण बंदर परिसरात जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारणार ! राज्यातील १९० बाजार समित्यांमध्ये ‘शेतकरी भवन’कोपरगाव येथे पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

नवी मुंबई विमानतळावर राष्ट्रीय आपत्ती रंगीत तालीम

पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान .

महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी;27 परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

राज्यातील अहिल्यानगर : अकोले तालुक्यातील आजोबा पर्वतावर अडकलेले १५ पर्यटक स्थानिकांच्या मदतीने परतले सुखरूप.

vishwatmaklokswamivarta