vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) तर्फे जालना येथे मोफत वेब डिझाईन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) तर्फे जालना येथे मोफत वेब डिझाईन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

 

जालना, प्रतिनिधी): महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र, जालना पुरस्कृत सर्वसाधारण प्रवर्गातील युवक-युवतींकरिता सन 2026-27 अंतर्गत मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जालना येथे करण्यात आले आहे. लाभार्थीनी उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वतःचा स्वंयरोजगार निर्माण करावा हा कार्यक्रम आयोजनाचा मुख्य उद्देश असल्याने वेब डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रमावर- 1 महिना कालावधीच्या या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये करिअर वेब टेक्नोलॉजी, वेब डिझायनर व वेब डेव्हल्प, मार्क लँग्वेज, मार्क अप, बेसिक स्ट्रक्चर, वेब साईड तयार करणे, इत्यादीचे प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे

तसेच उद्योजकता विकास प्रशिक्षण, या मध्ये उद्योजकिय गुण संपदा, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकासासाठी सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, बाजारपेठ, पाहणीतंत्र व तंत्र विपणन व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, कर्ज योजना व कर्ज प्रकरणे व्यवस्थापन व विक्री कौशल्य लघु उद्योग विषयक कायदे, शासकीय धोरणे, अकाउंटस, लघु उद्योजकाचे व्यवस्थापन, बँकेचे व्यवहार इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. सदरील कार्यक्रम हा संपुर्णतः मोफत असुन यासाठी लाभार्थी किमान 7 वी पास, वयोमर्यादा 18 ते 45वर्ष पात्रता धारक इच्छुक लाभार्थीना प्रवेश व अधिक माहितीसाठी सुरेखा मोरे मो. 9699334648 कार्यक्रम आयोजक यांच्याशी किंवा प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, विनोद तुपे जालना द्वारा-मराठा पार्क बिल्डिंग, विशाल कॉर्नर, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) चौफुली, जालना. फोन.नं.02482-220592 येथे दि.11 जुन, 2026 पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिऊके, जालना योगेश सारणीकर, व विभागीय अधिकारी सुदाम थोटे, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातर्फे मिरज येथेआपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मॉकड्रील

vishwatmaklokswamivarta

२० व २१ जून रोजी ‘स्पेशल ऑनलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह’; १० वी पास ते पदवीधरांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची भरती…

vishwatmaklokswamivarta

नागरिकांच्या जीवनात सकारात्क बदल घडविण्यावर महसूल विभागाचा प्रयत्न -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूलमंत्र्यांच्या हस्ते ‘एम.ई.अे. इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो-२०२६’ चे उद्धाटन

नांदेड जिल्ह्यात खरीपसाठी मुबलक #खत साठा उपलब्ध• शेतकऱ्यांनी अफवांना बळी न पडता खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये

औषधी व सुगंधी वनस्पतीच्या लागवड अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन