vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळेत सन २०२६-२७ साठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळेत सन २०२६-२७ साठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड यांच्या अधिपत्याखाली अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी जावळी, ता. माणगाव येथे कार्यरत असलेल्या शासकीय निवासी शाळेत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या गरीब, हुशार, होतकरू व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.

शासन निर्णय क्र. बी.सी.एच.-२०११/प्र.क्र.२११/मावक-४ दि. २९ जून २०११ नुसार प्रवेशासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून अनुसूचित जातींसाठी ८० टक्के, अनुसूचित जमातींसाठी १० टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ५ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के तर अपंग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे.

या निवासी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त इमारत, निसर्गरम्य वातावरण, मोफत निवास व भोजन व्यवस्था, शैक्षणिक साहित्य, मोफत गणवेश, भव्य क्रीडांगण, क्रीडा साहित्य, स्पर्धा परीक्षांची तयारी, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा तसेच डिजिटल क्लासरूमसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

शाळेची प्रवेश प्रक्रिया दि. १ एप्रिल २०२६ पासून सुरू करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२१४१-२२२२८७ तसेच शासकीय निवासी शाळा, जावळी येथील ९५११२२८६५४, ९८५०१७०७६२ किंवा ८६००८३८३८८ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला, पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, मागील इयत्तेचे गुणपत्रक, संचयी पुस्तिका, अपंग प्रमाणपत्र (लागू असल्यास), पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्ड, बँक पासबुक व वैद्यकीय प्रमाणपत्र अशी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.

तसेच अनुसूचित जाती व जमाती विद्यार्थ्यांसाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांच्या आत, तर विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व अपंग घटकातील विद्यार्थ्यांसाठी १ लाख ५० हजार रुपयांच्या आत असणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात पाणीटंचाई व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत

समाजकल्याण कार्यालयात तृतीयपंथीय स्मृतीदिन उत्साहात साजरा; समान हक्क व सन्मानावर भर

vishwatmaklokswamivarta

बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार दक्षता पथकांची स्थापना

बीड जिल्ह्यातील हत्याकांड – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड पुणे पोलिसांच्या ताब्यात सीआयडीला शरण, बीड पोलिसांच्या ताब्यात.

vishwatmaklokswamivarta

नगर भूमापन अधिकारी कार्यालय सांगली येथे सोमवारी फेरफार अदालत

vishwatmaklokswamivarta

बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणारभविष्यात बिबट्यांच्या हल्ल्यात एकही मृत्यू होणार नाही यासाठी यंत्रणा सतर्क– वन मंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta