vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी 3 ठिकाणी धाड, 9 सिलेंडर जप्त- पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार फिरत्या पथकाची कारवाई

इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी 3 ठिकाणी धाड, 9 सिलेंडर जप्त- पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार फिरत्या पथकाची कारवाई

 सांगली, प्रतिनिधी : सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमिवर जिल्ह्यात एलपीजी सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी फिरत्या दक्षता पथकांचा पहारा ठेवण्यात येत आहे. या पथकांमार्फत 3 ठिकाणांवर धाड टाकून तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये एकूण 9 सिलेंडर जप्त करण्यात आले असून, सदरील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.

सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमिवर जिल्ह्यात एलपीजी सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागामार्फत नियुक्त फिरत्या दक्षता पथकांनी घरगुती गॅस सिलिंडर अवैधरीत्या वापरणाऱ्यांवर निर्बंध लादण्यासाठी धाडींचे प्रमाण वाढवले आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

 घरगुती एलपीजी गॅसचे सुरळीत वितरण व्हावे तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता व फिरते पथक नियुक्त करण्यात आले आहे. गॅस एजन्सीकडून सिलिंडरचा गैरमार्गाने पुरवठा केल्याचे आढळल्यास अथवा घरगुती एलपीजीचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

00000

संबंधित पोस्ट

मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद योग्यरित्या झाली असल्याबाबत तपासणी करुन घ्या-जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र केसरी विजेत्या हर्षवर्धन सदगीरचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून अभिनंदन पै. हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरी किताबासह कुस्तीप्रेमींची मने जिंकली – उपमुख्यमंत्री

विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील-घाट परिसरात 25-26 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज…विदर्भ (प्रामुख्याने पूर्व विदर्भ) आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात धरण साठ्यात वाढ आणि नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे

vishwatmaklokswamivarta

तुप्पा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद ७४२ सातबारा व ५१२ आठ-अ उताऱ्यांचे वाटप; ४५ जणांना संजय गांधी योजनेचा लाभ

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचाल एकाच दिवशी 778 ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी

जालना पाटबंधारे विभागाचा कडक इशारा-पाणीपट्टी न भरल्यास पाणी व वीज पुरवठा खंडित करणार