vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत;*वाहतूक सुरळीत करण्यासाठी वेगात उपायोजना*

*मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत;*वाहतूक सुरळीत करण्यासाठी वेगात उपायोजना*

राज्य प्रतिनिधी-मुंबई-गोवा महामार्गा वर कशेडी जवळ येथे दरड कोसळली आहे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई कडून गोवा जाणारी वाहतूक प्रभावित झालेली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या यंत्रणेकडून अडथळे दूर करून वाहतूक नियमित करण्यासाठी काम केले जात आहे. परिसरात पाऊस व वारा जोरदार आहे. सदर दरड चा काही भाग जवळ घरांच्या परिसरात आल्याने त्या परिसरातील लोकांनी सुरक्षित ठिकाणी हलवले आहे

    वरंधा घाटात दरडी कोसळल्यामुळे सध्या रस्ता रस्ता बंद आहे. रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसात वरंधा घाटातील वारवंड ते उंबर्डे हद्दीदरम्यान चार पाच ठिकाणी दरडी कोसळून रस्त्यावर आल्या आहेत. सध्या रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दरडी हटवण्याचे काम सुरु आहे.

    रायगड जिल्हा मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातील बार्जेस वाहून आल्याने पुलाजवळ अडकल्या आहेत. पुलाला धोका असल्याने तात्पुरती मंडणगड – म्हाप्रळ गोरेगाव – माणगाव वाहतूक बंद केली आहे. सदर जागी पोलीस विभाग, महसूल , सार्वजनिक बांधकाम विभाग , जिल्हा परिषद यांचे वतीने आवश्यक उपाययोजना सुरू आहेत.

        पेण -खोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यातील कानसळ येथील अंबा नदीजवळ फसलेले 12 कामगार यांना बचाव करत सुखरूप बाहेर काढले आहे अशी माहिती स्थानिक प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

पूर, दरड कोसळणे, रस्ता बंद होणे किंवा इतर कोणत्याही आपत्तीजन्य परिस्थितीत तात्काळ संबंधित यंत्रणेशी क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय-पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

22 एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी विविध विकास कामांचे ई-भूमिपूजनक्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन स्मारकस्थळी महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी बचतीतून लघुउद्योग सुरू केले-महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करताना त्यांना डिजिटल आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

महाज्योती’च्या संशोधकाचा-‘कॅडमियम टेलुराईड सोलर सेल’वर अनोखा अभ्यास,स्वच्छ सौर ऊर्जा स्त्रोतावर डॉ.दीपमाला साळी यांचे उपयुक्त संशोधन,माफक दरात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेची निर्मितीवर शोध प्रबंध…

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातून मोघलाई नष्ट केली ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta