vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; नाशिक येथे मोफत पूर्व प्रशिक्षण

सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; नाशिक येथे मोफत पूर्व प्रशिक्षण

जालना, प्रतिनिधी : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी हे प्रशिक्षण नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी आयोजित करण्यात येणारे हे प्रशिक्षण २१ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी २० सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक रोड, नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षणासोबत निवास व भोजनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे

जालना जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाची संधी मिळविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत मुलाखतीसाठी हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या संकेतस्थळावरून SSB परीक्षेसाठी असलेले कॉल लेटर डाउनलोड करून त्याची प्रिंट सोबत आणावी. संबंधित कागदपत्रांची पूर्तता करूनच मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे.

SSB वर्गामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवाराकडे खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे—• CDSE-UPSC किंवा NDA-UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी आणि त्यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या मुलाखतीस पात्र ठरलेले असावे.• NCC Special Entry साठी SSB मुलाखतीचे कॉल लेटर असावे.• Technical Graduate Course साठी SSB मुलाखतीचे कॉल लेटर असावे.• University Entry Scheme साठी SSB कॉल लेटर असावे किंवा SSBसाठी शिफारस केलेल्या यादीत उमेदवाराचे नाव असावे.

या पात्रतेपैकी कोणतीही एक अट पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना संबंधित प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. प्रशिक्षणासंदर्भातील अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथील प्रभारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. कार्यालयीन वेळेत training.pctcnashik@gmail.com या ई-मेलवर तसेच दूरध्वनी क्र. 0253-2457902 किंवा 9156073306 या क्रमांकांवर संपर्क साधवा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना (अतिरिक्त कार्यभार) यांनी केले आहे.

 

****

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाशिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे २५ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्हा पूरस्थिती व अतिवृष्टी बचावकार्य संदर्भात माहिती

vishwatmaklokswamivarta

बिहारमधील बावनबुटी साडी बनवणाऱ्या विणकर महिलांच्या आर्थिक उन्नतीमध्ये योगदानाबद्दल गौरव जानकीदेवी बजाज पुरस्काराने वीणा उपाध्याय राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

हरंगुळ खुर्द येथे जागतिक बालमजुरी विरोधी दिन आणि मोफत शिक्षण हक्क कायद्याविषयी मार्गदर्शन

लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी, जिजाऊंच्या लेकीविरोधात अपशब्द प्रकरणी खारघर पोलीस स्टेशनला निवेदन

vishwatmaklokswamivarta