vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बिहारमधील बावनबुटी साडी बनवणाऱ्या विणकर महिलांच्या आर्थिक उन्नतीमध्ये योगदानाबद्दल गौरव जानकीदेवी बजाज पुरस्काराने वीणा उपाध्याय राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

बिहारमधील बावनबुटी साडी बनवणाऱ्या विणकर महिलांच्या आर्थिक उन्नतीमध्ये योगदानाबद्दल गौरव जानकीदेवी बजाज पुरस्काराने वीणा उपाध्याय राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

 

मुंबई, प्रतिनिधी: आयएमसी चेंबर महिला विभागातर्फे देण्यात येणारा 31 वा. ‘जानकीदेवी बजाज पुरस्कार’ श्रीजनी फाउंडेशनच्या संस्थापिका वीणा उपाध्याय यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

श्रीमती उपाध्याय यांनी बावनबुटी साडी विणणाऱ्या महिला कारागिरांना प्रोत्साहन देऊन या कलेचे पुनरुज्जीवन करताना बिहारमधील ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविल्याने हा पुरस्कार मिळत आहे.

आयएमसी सभागृहात मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाला आयएमसी महिला विभागाच्या अध्यक्ष ज्योती दोशी, उपाध्यक्ष राज्यलक्ष्मी राव, जानकीदेवी बजाज पुरस्कार समितीच्या अध्यक्षा नयनतारा जैन, उद्योगपती शेखर बजाज, नीरज बजाज तसेच बजाज कुटुंबातील सदस्य व निमंत्रित उपस्थित होते.००००

संबंधित पोस्ट

🇮🇳 भारतीय पॅरा ॲथलीट्सची सुवर्ण कामगिरी!वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स २०२६’ मध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या कौशल्याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.पुरुषांच्या उंच उडीत भारताला दोन सुवर्णपदके

बेलापूर पारसिक हिल येथे आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपणातून हरित नवी मुंबईची रूजवात…

ब्रेकवॉटर भिंत व प्रवासी जेटी प्रकल्पामुळे पर्यटन व मत्स्यव्यवसायाला चालना     – मत्स्यव्यवसाय,बंदरे मंत्री नितेश राणे*

राज्यपालांच्या हस्ते अनंत कन्हेरे यांचेवरील पुस्तकाचे प्रकाशन

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे ; पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची सर्व विकासकामे विहित मुदतीत, गुणवत्तापूर्ण करा – मंत्री गिरीश महाजन