vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा भाग म्हणून, भारतीय नौदलाचा बँड मुंबईतील विविध महत्त्वाच्या ठिकाणी सादरीकरण करणार

स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा भाग म्हणून, भारतीय नौदलाचा बँड मुंबईतील विविध महत्त्वाच्या ठिकाणी सादरीकरण करणार

राज्य प्रतिनिधी-2025 च्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा भाग म्हणून, भारतीय नौदलाचा बँड मुंबईतील विविध महत्त्वाच्या ठिकाणी सादरीकरण करणार आहे. याअंतर्गत खाली नमूद ठिकाणी संध्याकाळी 5:30 ते 6:30 या वेळेत हे सादरीकरण केले जाईल :

* 11 ऑगस्ट 2025 रोजी फ्लोरा फाउंटन, फोर्ट * 14 ऑगस्ट 2025 रोजी बांद्रा फोर्ट ॲम्फीथिएटर * 15 ऑगस्ट 2025 रोजी गेटवे ऑफ इंडियाबँडचे हे सादरीकरण कार्यक्रम सामान्य जनतेलाही पाहण्यासाठी खुले असतील. देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्राभिमान वृद्धिंगत करणे, हा या सादरीकरणांचा उद्देश आहे. नागरिकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे प्रोत्साहनपर आवाहनही केले जात आहे.

भारतीय नौदल बँडची सुरुवात 1945 मध्ये झाली होती. त्यावेळी काही नौदलातील काही मोजक्या संगीतकारांसह या बँडची स्थापना केली गेली होती. गेल्या काही वर्षांत, या बँडने देशभरातील तसेच विशेषतः भारतीय नौदलाची युद्धनौका परदेशी मोहिमांवर असताना जगभरातील श्रोत्यांचे मनोरंजन करत राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे.

विविधता हे भारतीय नौदलाच्या बँडचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये उत्साहवर्धक लष्करी संगीत, सिम्फनी, ओव्हर्चर, कॉन्सर्टो, भारतीय शास्त्रीय संगीत आणि पॉप तसेच लोकसंगीत यांसारख्या अनेक समकालीन प्रकारांचा अंतर्भाव असतो.

संबंधित पोस्ट

मुंबई लोकल ट्रेनमधील हत्येचा उलगडा: २४ तासांच्या आत आरोपीला अटक

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज दि .4 जुलै रोजी मुंबईत**गेटवे ऑफ इंडिया जवळ कॅन्डल मार्च**केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले नेतृत्व करणार*

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केली पाहणी

कृष्णा, कुडाळी व वसना नदीमधून पाणी उपसा करण्यास बंदी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून बळीराजाला दिलासा देण्याच्या प्रयत्न – मंत्री चंद्रकांत पाटील – राज्यात ३६ हजार कोटींची कर्जमाफी; ५६ लाख शेतकऱ्यांना होणार लाभ – अधिकाऱ्यांनी गावोगावच्या शेतकऱ्यांना योजनेची माहिती देण्याचे निर्देश

टी-२० विश्वचषक फायनल: १०,००० कोटींच्या सट्टेबाजी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा ! – सुराज्य अभियानाचे नागपूर व गोवा येथील तक्रारींना समर्थन*