vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

टी-२० विश्वचषक फायनल: १०,००० कोटींच्या सट्टेबाजी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा ! – सुराज्य अभियानाचे नागपूर व गोवा येथील तक्रारींना समर्थन*

टी-२० विश्वचषक फायनल: १०,००० कोटींच्या सट्टेबाजी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा ! – सुराज्य अभियानाचे नागपूर व गोवा येथील तक्रारींना समर्थन*

 

  *नागपूर/पणजी* : आज अहमदाबाद येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार्‍या टी-२० विश्वचषक २०२६ अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर देशात चालू असलेल्या १०,००० कोटी रुपयांच्या अवैध सट्टेबाजी रॅकेटचा उलगडा होत आहे. हाय-टेक ॲप्स व ऑफशोअर सर्व्हरद्वारे हा घोटाळा चालवला जात असून, रायबंदर, पणजी येथील जागरूक नागरिक श्री. दिलीप शेट्ये यांनी पणजी पोलीस आयुक्त व पोलीस महासंचालक यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. नागपूर येथे एका जागरूक नागरिकाने इ-मेलद्वारे तक्रार नोंदवली असून, या तक्रारींना हिंदू जनजागृती समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT)मार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी समितीने केली आहे.

 काही प्रमुख वृत्तपत्रांत या सट्टेबाजीविषयी वृत्त प्रसिद्ध झाले आहे. खरे तर याची सुमोटो दखल घेऊन पोलीस प्रशासनाने तत्परतेने कारवाई करायला हवी होती. सुराज्य अभियानाने म्हटले आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणावर चालणारी अवैध सट्टेबाजी भारताच्या जागतिक प्रतिमेला तडा देणारी आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की होत असून भारतीय क्रिकेटची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. खरे तर क्रिकेटच्या निमित्ताने सट्टा-जुगार मोठ्या प्रमाणावर चालतो. हे चालवणारे काही ठराविक लोक असतात, हे तपासयंत्रणांना माहिती असते. अनेक सट्टेबाजांना पकडल्याच्या बातम्या तर येतात; मात्र पुन्हा सट्टाबाजार बिनबोभाट कोणाच्या आशीर्वादाने चालू रहातो, हे शोधण्याची, तसेच छोट्या माश्याऐवजी मोठा मासा पकडण्याची नितांत गरज आहे.

 या संदर्भात सुराज्य अभियानाने मागणी केली आहे की, १०,००० कोटींच्या या आकड्याची भीषणता लक्षात घेता, पोलिसांनी तात्काळ संबंधित प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून या माहितीच्या स्रोताची तपासणी करावी आणि सट्टेबाजांचे नियंत्रण कक्ष उद्ध्वस्त करावेत. जप्त रक्कम जनहिताच्या योजनांसाठी वापरावी. केंद्र सरकारने संमत केलेल्या ‘ऑनलाइन गेमिंग कायदा २०२५’नुसार ही कारवाई करावी, ज्यात अवैध सट्टेबाजीला मदत अजामीनपात्र गुन्हा आहे. अंमलबजावणी संचालनालय (ED) व सायबर सेलने हवाला मार्ग व डिजिटल पेमेंट गेटवेज बंद करावेत. स्थानिक बुकी आणि आंतरराष्ट्रीय सिंडिकेट यांच्यातील संबंधांचा शोध घेण्यासाठी राज्य स्तरावर तात्काळ ‘विशेष तपास पथक’ स्थापन करावे.

आपल्या देशाची आणि क्रिकेटची जगभरात बदनामी होऊ नये, यासाठी सामना संपण्यापूर्वीच या रॅकेटवर देशांतर्गत सर्जिकल स्ट्राईक होणे गरजेचे आहे, असे सुराज्य अभियानाने म्हटले आहे. प्रशासकीय पारदर्शकता आणि राष्ट्रीय हितासाठी सुराज्य अभियान या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील.आपला नम्र,*श्री. अभिषेक मुरूकटे* ,महाराष्ट्र राज्य समन्वयक, ‘सुराज्य अभियान’,संपर्क : ९८६७५५८३८४

संबंधित पोस्ट

*हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे* *-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन*

अलिबाग-वडखळ मार्गावर शनिवार-रविवारी जड वाहनांची वाहतूक बंद पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा निर्णय..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तदि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी टूर सर्कीटचे आयोजन-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई महाराष्ट्रातील चैत्यभूमी, दीक्षाभूमी, मुक्ती भूमी यांसारख्या ठिकाणांचा समावेश.. 

स्वातंत्र्यदिन सोहळा-विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर जनतेचा सहभाग आवश्यक- पालकमंत्री संजय शिरसाट

विधानपरिषद साठी भास्कर आबा दानवे यांच्या उमेदवारीची शिफारस करा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवेंना निवेदन

नागरिकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नोंदणी करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल· जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण· अटल पेंशन योजनेअंतर्गत सर्वोकृष्ट जिल्हा पुरस्कार