vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अलिबाग-वडखळ मार्गावर शनिवार-रविवारी जड वाहनांची वाहतूक बंद पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा निर्णय..

अलिबाग-वडखळ मार्गावर शनिवार-रविवारी जड वाहनांची वाहतूक बंद पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा निर्णय..

रायगड प्रतिनिधी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अलिबाग ते वडखळ राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ए या मार्गावर दर शनिवार व रविवार जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.

या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्या खासगी वाहनांद्वारे येत असल्याने दर आठवड्याच्या शेवटी येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यामुळे रुग्णवाहिकांना अडथळा, तसेच अपघाताची शक्यता वाढते. पोलिस अधीक्षक रायगड यांनी सुचविलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

वाहतूक बंदीचे वेळापत्रक,शनिवार: सकाळी ८ ते दुपारी २,रविवार: दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत असे राहील.जड-अवजड वाहने (ट्रक, कंटेनर, डंपर इ.) इत्यादी वाहनांना बंदी असेल.तर दूध, डिझेल, पेट्रोल, एलपीजी गॅस,औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणारी वाहने,रुग्णवाहिका, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, महिला सशक्तीकरण मोहिमेसाठी नेमलेली वाहने यांना या कालावधीत मुभा असेल.हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत तो लागू राहील. स्थानिक नागरिक व पर्यटकांना यामुळे सुरक्षित, सोयीस्कर व अडथळा विरहित प्रवासाचा अनुभव मिळेल.वाहनचालक व नागरिकांनी सहकार्य करावे, वाहतूक बंदीच्या वेळा लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन नव संशोधनासाठी उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला स्वायतत्ता देणे ही काळाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मिनी सरस सावित्री जत्रा’ जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन आणि यशवंत पंचायतराज अभियान विभागस्तरीय पुरस्कार व महाआवास अभियान जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात 117 उपाययोजनांचा समावेश

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचाल एकाच दिवशी 778 ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणी दिनांकात बदल21 डिसेंबरला होणार मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta