vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश ससून डॉक बाबत घेतली आढावा बैठक

मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश ससून डॉक बाबत घेतली आढावा बैठक

मुंबई, प्रतिनिधी :ससून डॉक येथील मच्छिमार, महिला कामगार आणि बोटधारकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, या परिसराच्या आधुनिकीकरणाला वेग दिला जाईल, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित एका महत्त्वपूर्ण बैठकीत चा सविस्तर आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतला. यावेळी मच्छिमारांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

ससून डॉक येथे मत्स्य व्यावसायिक आणि विशेषतः महिला कामगारांसाठी शासनाने बांधलेले विश्रामगृह तातडीने खुले करावे, असे स्पष्ट निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. यामुळे कामाच्या ठिकाणी महिलांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

बोटधारक आणि व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक तसेच प्रशासकीय अडचणींवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.मासे उतरवणे, साठवणूक आणि विक्री या साखळीत मच्छिमारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीला आमदार राजेश राठोड, मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मच्छिमार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००

संबंधित पोस्ट

पॅन – आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

vishwatmaklokswamivarta

जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र व प्रशासकीय इमारतीचा भूमिपुजन समारंभ सपंन्न*

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘कलाविष्कार २०२५’ पारितोषिक वितरण

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक बांधकाम विभाग-भंडारा ते गडचिरोली ९४ किलोमीटरचा द्रुतगती महामार्गभूसंपादनासह अनुषंगिक ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता

vishwatmaklokswamivarta

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवल्यात नमो उद्यानाचे भूमिपूजन नमो उद्यानातून येवल्याच्या वैभवात अधिक भर – मंत्री छगन भुजबळ

विशेष भारत मोशन पिक्चर असोसिएशनसोबत जागतिक स्तरावर उद्योग सह-निर्मिती करण्यास उत्सुक – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन