vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

♦️मुंबईत मानखुर्द येथे तीन मजली चाळीतली दोन-तीन घरं कोसळून सहाजणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मदत जाहीर.

मुंबईत मानखुर्द येथे तीन मजली चाळीतली दोन-तीन घरं कोसळून सहाजणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मदत जाहीर….

 

मुंबई प्रतिनिधी-मुंबईत मानखुर्द इथं तीन मजली चाळीतली दोन-तीन घरं कोसळून सहाजणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मदत जाहीर.

मुंबईतील मानखुर्द भागात जनता नगर परिसरात काल, रविवार (5 जुलै 2026) रोजी रात्री साडेआठच्यासुमारास अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरात असलेल्या तीन मजली कच्च्या चाळीतील २ ते ३ घरे अचानक कोसळली. या दुर्घटनेत ५ लहान मुले आणि एक स्त्री अशा एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

मुंबईतील मानखुर्द  भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. धोकादायक असलेली ही चाळ रिकामी करण्यासाठी घरातील सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर कोसळले. या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे 5 निष्पाप लहान मुले आणि एका महिलेसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यादुर्घटनेनंतरमुंबईच्या महापौर रितू तावडे  यांनी गोवंडी रुग्णालयात जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केलेआहे. तरराज्याचेआपत्तीव्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन  यांनीदेखीलघटनास्थळीभेटदिलीय. यावेळीधोकादायकइमारतींचीचौकशीहोणार, अशीमाहितीमंत्री गिरीश महाजन यांनीदिलीआहे

मुंबईतील मानखुर्द भागात एक घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या प्रसंगात त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही त्यांनी म्हटले असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली आहे.

संबंधित पोस्ट

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ शपथ,पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक बांधिलकी आवश्यक विभागीय आयुक्तांकडून वृक्ष लागवड

अमरावतीत १०० मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी इमारतीची आवश्यकता;१५ दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन 

अमृतच्या लक्षित गटातील परिवार सर्वेक्षण अभियानास प्रारंभ…

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन म्हणजे सलोखा, एकता, संस्कृती आणि विविधतेचा उत्सव- क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई मॅरेथॉनचा रिंगिंग बेल कार्यक्रम संपन्न..

vishwatmaklokswamivarta

वेतन टप्पा अनुदानासाठी शासनाची सकारात्मक भूमिका- शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल ठाण्यात यशस्वी; आपत्कालीन तयारीची प्रभावी चाचणी*