vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल ठाण्यात यशस्वी; आपत्कालीन तयारीची प्रभावी चाचणी*

*”ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल ठाण्यात यशस्वी; आपत्कालीन तयारीची प्रभावी चाचणी*

 

     *ठाणे, प्रतिनिधी:-* केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित करण्यात आलेले आपत्कालीन परिस्थितीसाठीच्या सज्जतेचे परीक्षण करणारे “ऑपरेशन अभ्यास” हे मॉक ड्रिल आज, दि. 11 मे 2025 रोजी ठाण्यातील लोढा अमारा, कोलशेत मैदानावर यशस्वीरित्या पार पडले. दुपारी 4.30 वाजता सायरन वाजवून या मॉक ड्रिलची सुरुवात झाली आणि त्यानंतर पूर्वनियोजित घटनाक्रमाप्रमाणे सर्व कार्यवाही अत्यंत प्रभावीपणे पार पडली.

 जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने व प्रांताधिकारी उर्मिला पाटील, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसिलदार उमेश पाटील, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवाणी, कमलेश श्रीवास्तव, विभागीय क्षेत्ररक्षक रुपेश निंबाळकर, अयुब शिकलगार, सगीर खान, शकुंतला राय, बुद्धदास जाधव, अरुण सातपुते, प्रमोदिनी जाधव, डॉ. राहुल घाटवळ, हनुमान चौधरी श्री.भुजबळ, संजय मगर, सुनिल टेकचंदानी, मानसेवी निदेशक डॉ.प्रकाश ठमके यांच्या सक्रिय पुढाकारातून हे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते.

     मॉक ड्रिलच्या दरम्यान, काल्पनिक परिस्थितीत एअर स्ट्राईक/बॉम्ब हल्ल्याची सूचना देण्यात आली. यानंतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी त्वरित सूचनांचे प्रसारण करण्यात आले. नागरिकांनी कोणताही गोंधळ अथवा धावपळ न करता शांतपणे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन केले आणि सुरक्षितस्थळी आश्रय घेतला. त्यानंतर, संबंधित परिसरात शोध मोहीम राबवून जखमी तसेच अडकलेल्या 40 नागरिकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आणि त्यांना प्रथमोपचार पुरविण्यात आले. इमारतीत अडकलेल्या 5 जणांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली.

     या संपूर्ण कार्यवाहीदरम्यान, सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत गांभीर्याने सहभाग घेतला आणि केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले. मॉक ड्रिलदरम्यान कुठल्याही प्रकारची अफवा पसरली नाही आणि नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला.

    मॉक ड्रिलच्या यशस्वी समारोपानंतर प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि तहसिलदार उमेश पाटील यांनी सांगितले की, हे मॉक ड्रिल केवळ आपत्कालीन परिस्थितीत आपली तयारी किती आहे, हे तपासण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. कोणतीही खरी आपत्ती ओढवलेली नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. त्यांनी नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

  या महत्त्वपूर्ण मॉक ड्रिलच्या वेळी प्रांताधिकारी उर्मिला पाटील, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव, तहसिलदार उमेश पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त दिनेश तायडे, सहायक आयुक्त सोनल काळे, ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, उपायुक्त प्रणाली घोंगे, मुख्य अग्निशमन नियंत्रण अधिकारी निलेश झलके, सहाय्यक पोलीस आयुक्त ममता डिसूझा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पोळ, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  एकंदरीत, “ऑपरेशन अभ्यास” हे मॉक ड्रिल ठाणे शहरात अत्यंत यशस्वीरित्या पार पडले आणि यातून आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची आणि नागरिकांची सज्जता प्रभावी असल्याचे दिसून आले. या संपूर्ण मॉक ड्रिल मध्ये महसूल, आरोग्य, पोलीस, नागरी संरक्षण दल, होमगार्ड, ठाणे महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ चे जवान, अग्निशमन दल , लोढा अमारा गृह संकुलातील अग्निशमन यंत्रणेचे जवान, सुरक्षा रक्षक आणि तेथील नागरिक या सर्वांनी आपला सहभाग नोंदविला.

000000

संबंधित पोस्ट

पाणी टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकर सुरू करा- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर शिवसेना शिष्टमंडळाने घेतली जि.प.सिईओची भेट

लाडकी बहीण योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार…

vishwatmaklokswamivarta

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

vishwatmaklokswamivarta

मसाज_पार्लरमध्ये_सुरू_होता_धक्कादायक_प्रकार नवी_मुंबईचे_पोलीस_पोहोचले_अन्…

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !‘मनाचे श्लोक’ नावाचा चित्रपट म्हणजे संत वाड्मयाचा अपमान !चित्रपटाचे नाव न बदलल्यास हिंदू समाज चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – हिंदु जनजागृती समितीचा इशारा

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धेसाठी अर्ज करण्याचे आवाहन- जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर