vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध,पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध,पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन

सांगली, प्रतिनिधी: सध्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत सर्वसाधारणपणे सर्वच पेट्रोल पंपावर अतिरीक्त स्वरुपामध्ये वाहनांमध्ये इंधन साठा करण्यासाठी गर्दी होऊन पेट्रोल पंपावर वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर सांगली जिल्ह्यामध्ये पेट्रोल व डिझेलचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध असून इंधन पुरवठा सुरळीत सुरु आहे. सर्वच पेट्रोल पंप कंपनीच्या विक्री अधिकारी / प्रतिनिधी यांना प्रशासनाच्या मार्फत इंधन पुरवठा सुरळीत ठेवणेकामी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे,.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, सांगली जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नाही. सर्व पेट्रोल पंपावर नियमितपणे इंधनाचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करणे योग्य होणार नाही. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा पूर्वतयारीचा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

हिंद दि चादर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून चार बस रवाना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दाखवला हिरवा झेंडा- शनिवारी 3 बस होणार रवाना- जिल्ह्यातील 296 नागरिक होणार सहभागी

16 जूनला महानगरपालिकेच्या सर्व 80 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव…

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार कराल तर होईल गुन्हा दाखल विद्यार्थी, पालक,शिक्षकआणि नागरिकांना इशारा -जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी

vishwatmaklokswamivarta

अपघातास कारणीभूत विजेचे खांब आणि रोहित्रांबाबत अधिक्षक अभियंता, आयुक्तांना नोटीसअन्यथा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार – अ‍ॅड. ईश्वर बिल्होरे…

vishwatmaklokswamivarta