vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्यावी-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ· अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा, सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामांचा आढावा…

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्यावी-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ· अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा, सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामांचा आढावा…

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा आणि सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या बांधकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा मंत्रालयामध्ये दूरदृष्य प्रणालीद्वारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी ही वैद्यकीय महाविद्यालये अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी.

या बैठकीत प्रत्येक महाविद्यालय व रुग्णालय यांच्या बांधकामांची प्रगती, निधी वितरण, मनुष्यबळ नियोजन तसेच आवश्यक सुविधा उभारणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. काही ठिकाणी कामांना गती मिळाली असली तरी काही प्रकल्पांबाबत तातडीने सुधारात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश मंत्री मुश्रीफ यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामास होत असलेल्या दिरंगाई बद्दल संबंधित कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी दिले

रुग्णालयीन सुविधा, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, विद्यार्थी वसतिगृहे आणि प्राध्यापकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा यांची उभारणी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर संबंधित भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

बैठकीस वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव संदीप ढाकणे उपस्थित होते तसेच संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

खडकपूर्णा धरणातून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या १५ बोटी जिलेटिनद्वारे उध्वस्त,सिंदखेडराजा, बुलढाणा आणि जालन्यातील पथकाची संयुक्त कारवाई

vishwatmaklokswamivarta

नाथषष्ठीनिमित्त सेवा भक्ती संगम**संत एकनाथांची लोकशिक्षणाची भूमिका प्रशासनाने अंगीकारावी- डॉ.सविता मुळे*

पाकिस्तानचा सतत सीमेवर जोरदार गोळीबार, अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित, भारताकडून चोख प्रत्युत्तर

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये – जिल्हाधिकारी अशोक काकडे

जालना येथील श्री विश्वराज आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी चिकित्सालय व पंचकर्म सेंटर १५ व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन संपन्न

vishwatmaklokswamivarta