vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अलिबाग वैद्यकीय महाविद्यालयात विविध सामाजिक उपक्रम

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अलिबाग वैद्यकीय महाविद्यालयात विविध सामाजिक उपक्रम

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी— क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अलिबाग येथे विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्टुडंट कौन्सिल कमिटीच्या वतीने हे उपक्रम राबविण्यात आले.

या उपक्रमांतर्गत १० एप्रिल रोजी माणी व भुते येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये आरोग्य जनजागृती अभियान राबविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीतील आरोग्य व्यवस्थापन, अॅनिमिया निर्मूलन तसेच हिपॅटायटीस ‘बी’ लसीकरणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा उद्देश होता.

दि. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) थळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. आरसीएफचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राध्यापक डॉ. सुधाकर बांटेवाड, डॉ. विशाल उबाले, आरसीएफचे रमेश कवळे तसेच रक्तपेढीचे डॉ. गोसावी यांची उपस्थिती होती. विद्यार्थी, कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.दि. १३ एप्रिल रोजी १८ तासांच्या अध्ययन उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ध्यान सत्रांचे आयोजन करण्यात आले.

दि. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. पूर्वा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

००००

संबंधित पोस्ट

लंपी आजारावर खासदार डॉ.कल्याण काळे यांची तात्काळ हस्तक्षेपाची मागणी    जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या संकटावर भावनिक आवाहन

vishwatmaklokswamivarta

आयुष मंत्रालय केंद्रीय आयुर्वेदिक संस्था तर्फे धारावी आरोग्य शिबिर संपन्न…

राष्ट्रीय नमुना पाहणीः कुटुंबांचे आरोग्य सर्व्हेक्षण

vishwatmaklokswamivarta

कुकशेत, नेरूळ परिसरात हिवताप-डेंग्यू प्रतिबंधात्मक जनजागृती दिंडी उत्साहात संपन्नआजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक काळजी घेणे महत्वाचे – महापौर श्रीम.सुजाता पाटील

कर्करोग तपासणी, जनजागृती मोहीम वेळोवेळी राबवा- जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हाधिकारी कार्यालयात मौखिक कर्करोग जनजागृती अभियान

टीबी मुक्त ग्रामपंचायतींना 28 कास्य, 136 रोप्य मानांकनाने सन्मानित  टीबी मुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहा- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे..