vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

एचपीव्ही लस सुरक्षित; अफवांना बळी पडू नका-डॉ. अमोल गीते यांचे आवाहन

एचपीव्ही लस सुरक्षित; अफवांना बळी पडू नका-डॉ. अमोल गीते यांचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी: महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणारा गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा गंभीर आणि चिंताजनक आजार ठरत असून, त्यापासून बचावासाठी एचपीव्ही (HPV) लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी स्पष्ट केले आहे. लसीबाबत समाजात पसरत असलेल्या अफवा व गैरसमजांना बळी न पडता नागरिकांनी जागरूकता ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) हा गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचा मुख्य कारणीभूत घटक आहे. या विषाणूपासून संरक्षण मिळवण्यासाठी एचपीव्ही लस प्रभावी उपाय ठरते. विशेषतः 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी ही लस अधिक उपयुक्त असून, योग्य वयात घेतल्यास भविष्यात कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

सध्या सोशल मीडियावर लसीबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. काही ठिकाणी लसीमुळे गंभीर दुष्परिणाम होतात, अशी भीती निर्माण केली जात आहे; मात्र ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. एचपीव्ही लस आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असून अनेक देशांमध्ये ती सुरक्षितपणे वापरली जात आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते सांगितले.

एचपीव्ही लस का महत्त्वाची : गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून प्रभावी संरक्षण, एचपीव्ही संसर्गाचा धोका कमी, योग्य वयात घेतल्यास दीर्घकालीन लाभ, सुरक्षित आणि परिणामकारक लसीकरण,

गैरसमज दूर करा : लसीमुळे गंभीर दुष्परिणाम होत नाहीत, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण पूर्णपणे सुरक्षित, अफवांपेक्षा डॉक्टरांचा सल्ला अधिक विश्वासार्ह.

मुलींच्या आरोग्यासाठी वेळेवर एचपीव्ही लसीकरण करून त्यांना गंभीर आजारांपासून सुरक्षित ठेवावे. महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेता, एचपीव्ही लस घेणे ही काळाची गरज आहे. ही लस सुरक्षित असून कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करते, असेही त्यांनी नमूद केले.

0000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे आजारांचे पुनर्विलोकन, अर्थसहाय्याची नव्याने निश्चिती, रुग्णालय संलग्नीकरण निकष ठरविण्याकरिता समिती

vishwatmaklokswamivarta

आरोग्य विभागाने माहेरघर योजना कार्यरत आरोग्य सेविकांचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स मोजमापासाठी ऑन द स्पॉट नि शुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन  

जिल्हा रुग्णालयाकडून ५५ मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

ओटी भरण कार्यक्रमानिमित्त वाई तालुक्यातील 925 गरोदर मातांची आरोग्य तपासणी

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टीबी फोरम समन्वय समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta