vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जागतिक ऑटिझम दिनानिमित्त लातूर जिल्हा परिषदेत जनजागृती

जागतिक ऑटिझम दिनानिमित्त लातूर जिल्हा परिषदेत जनजागृती

 

लातूर, प्रतिनिधी (जिमाका): जागतिक ऑटिझम दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा परिषदेत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने गुरुवारी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वमग्नता (ऑटिझम) या विषयावर समाजात व्यापक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रातील समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांना शांती व स्वीकृतीचे प्रतीक असलेली ‘निळी रिबीन’ बांधून या दिनाचे महत्त्व विषद केले. तसेच ऑटिझम या आजाराबद्दलची सविस्तर माहिती देणाऱ्या माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. या जनजागृती मोहिमेत ऑटिझम म्हणजे काय, त्याची मुख्य लक्षणे, सामाजिक व संवादातील अडचणी, पुनरावृत्ती वर्तन, आजाराची कारणे, लवकर ओळख, अचूक निदान आणि उपचार व व्यवस्थापन या विविध तांत्रिक आणि सामाजिक पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले.

यंदाच्या जागतिक ऑटिझम दिनाची मुख्य थीम “ऑटिझम आणि मानवता – प्रत्येक जीवनाला मूल्य आहे” अशी आहे. ही संकल्पना स्वमग्न व्यक्तींचा सन्मान, त्यांचे हक्क, सामाजिक समावेश आणि त्यांना मिळणाऱ्या समान संधींच्या महत्त्वावर भर देते. त्यांच्यातील अद्वितीय क्षमतांना वाव देणे आणि त्यांना समाजाचा अविभाज्य घटक मानणे, हा या थीमचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मानवता, मूल्य, सर्वसमावेशकता आणि जागरूकता या चतुःसूत्रीवर आधारित हे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे बस्वराज पैके यांच्यासह समाजकार्य विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.

****

संबंधित पोस्ट

जिल्हा कारागृहात आरोग्य शिबीर संपन्न

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम संपन्न

वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आणि थायोकेअर लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने..बुलढाण्यात मोफत थायरॉईड तपासणी शिबिर 3 सप्टेंबरला

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छतादूत व सफाईमित्रांची आरोग्य तपासणी

समाजकल्याण विभाग वंचितांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध – अपर जिल्हाधिकारी रेश्मा माळीसामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध उपक्रम : ज्येष्ठ नागरिक कार्यशाळा, आरोग्य व रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

हरीसाल आरोग्य केंद्राच्या पथकाकडून मातेला जीवनदान*प्रसूतीनंतरचा गंभीर रक्तस्त्राव रोखण्यात यश…

vishwatmaklokswamivarta