vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

15 जूनला नवी मुंबईत विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण व शुभारंभ

15 जूनला नवी मुंबईत विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण व शुभारंभ

 

         नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य सेवा बळकटीकरणांतर्गत विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण व कामांचा शुभारंभ सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी, सकाळी 11 वा. महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली. वाशी सेक्टर 10 येथील सार्वजनिक रूग्णालय येथे संपन्न होत आहे.

          याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य खा.श्री.नरेश म्हस्के, कल्याण लोकसभा सदस्य खा.डॉ.श्रीकांत शिंदे, विधानपरिषद सदस्य आ.श्री.निरंजन डावखरे व श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे, बेलापूर विधानसभा सदस्य आ.श्रीम.मंदाताई म्हात्रे, कल्याण ग्रामीण विधानसभा सदस्य श्री.राजेश मोरे हे मान्यवर मुख्य अतिथी म्हणून तसेच उपमहापौर श्री.दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील, सभागृह नेते श्री.सागर नाईक, विरोधी पक्ष नेते श्री.विजय चौगुले, परिवहन समिती सभापती श्री.विकास झंजाड हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे विविध समित्यांचे सभापती सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

         नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना पुरविण्यात येणा-या आरोग्य सेवांमध्ये या माध्यमातून भरीव वाढ करण्यात येत आहे. या आरोग्य सुविधांमध्ये – नमुंमपा आणि ना.श्री.गणेश नाईक यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून उभारण्यात आलेले स्वामी विवेकानंद भवन, से.14, वाशी येथील डायलिसीस सेंटरचे लोकार्पण होत आहे. तसेच सार्वजनिक रूग्णालय, सेक्टर 10, वाशी येथे –एम.आर.आय. सेंटर लोकार्पण, मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभाग (सी.एस.एस.डी.) कार्यान्वित करणे, रूग्णालय बेड्स उपलब्धता डॅशबोर्ड कार्यान्वित करणे, वाशी आणि ऐरोली येथे ह्रदयविकार उपचार केंद्र (कॅथलॅब) कामाचा शुभारंभ, मिल्क बँक सुविधा लोकार्पण, मॉड्युलर मॉर्च्युरी (शवागृह) कार्यान्वित करणे आदी सुविधा त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, से.8, सीबीडी बेलापूर येथील डायलिसीस सेंटर लोकार्पण आणि सेक्टर 24, जुईनगर येथील पशुवैद्यकीय रूग्णालय लोकार्पण तसेच महापे येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र लोकार्पण आदी विविध आरोग्य सुविधांचा समावेश आहे.

          नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल असून या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक आरोग्य परिरक्षण व वैद्‌यकिय सहाय्य समितीचे सभापती डॉ.जयाजी नाथ आणि उपसभापती श्री.गणेश सकपाळ तसेच सर्व समिती सदस्य यांच्या वतीने करण्यात येत आहे

0000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यात कर्करोग निदानासाठी फिरती कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन; नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

मलेरिया निर्मूलनासाठी आरोग्य विभाग सज्ज; जिल्हा सामान्य रुग्णालयात पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न*

vishwatmaklokswamivarta

दृष्टी आपल्या हक्काची, काळजी आपल्या आरोग्याची”“मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” अभियानाअंतर्गत मोफत तपासणी व शस्त्रक्रिया मोहिमेस ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

मासोदमध्ये आरोग्य स्थिती नियंत्रणात

vishwatmaklokswamivarta

जालना शहर महानगरपालिका आणि लायन्स क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार व नमो नेत्र संजीवनी मोफत नेत्र तपासणी, या अभियान

vishwatmaklokswamivarta

पंचायत समिती अंबरनाथ येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

vishwatmaklokswamivarta