vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या सामाजिक उपक्रमांचा महाराष्ट्रातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना लाभ*राज्याच्या विकासात बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या सामाजिक उपक्रमांचा महाराष्ट्रातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना लाभ*राज्याच्या विकासात बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

मुंबई, प्रतिनिधी : स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने गेल्या सात वर्षांत महाराष्ट्रात जलसुरक्षा, आरोग्यसेवा, रोजगारनिर्मिती आणि हवामान बदलाला तोंड देण्याच्या क्षमतेच्या विकासासाठी राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा राज्यातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना थेट लाभ झाला आहे. या उपक्रमांमुळे राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

       मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासन आणि खासगी क्षेत्र यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विकासाचे फायदे समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचत आहेत. जलसंवर्धन, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांत स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने केलेले कार्य राज्याच्या विकास उद्दिष्टांना पूरक ठरत आहे. बँकेच्या विविध सामाजिक उपक्रमांच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचे प्रमाण ५२ टक्क्यांहून अधिक असून, जलसंधारण, आरोग्यसेवा आणि उपजीविका वृद्धी या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये; तसेच राज्यातील ७५ टक्के आकांक्षी जिल्ह्यांमध्ये हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले आहेत.

*जलसुरक्षेसाठी व्यापक उपाययोजना*

जलसुरक्षा उपक्रमांतर्गत १.०६ अब्ज लीटर गोड्या पाण्याची साठवण क्षमता निर्माण करण्यात आली असून, दुष्काळग्रस्त भागांमध्ये ४५ वॉटर एटीएमची स्थापना करण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील गावांसह राज्यातील २७१ गावांमध्ये जलसुरक्षा मजबूत करण्यात आली आहे; तसेच ८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना जलसंवर्धन उपाययोजना आणि हवामान-सुसंगत शेती तंत्रज्ञानासाठी मदत करण्यात आली आहे. हवामान बदलाचे परिणाम कमी करण्याच्या दिशेने ७ लाख वृक्षांची लागवड हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

*रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना*

रोजगारक्षमतेच्या क्षेत्रात ६ हजार ५९८ युवकांना कौशल्य विकास आणि रोजगार प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यापैकी ६३ टक्के युवकांना रोजगार मिळाला आहे. इलेक्ट्रिक वाहने, वाहन उद्योग, कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स, बँकिंग आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ला

संबंधित पोस्ट

चिखली तालुक्यातील सवना येथे ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; नॅनो युरिया फवारणीचे मार्गदर्शन

सिरोंचा उपविभागात गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहनपाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता..

vishwatmaklokswamivarta

माणगाव येथील- रेड्डीज हॉटेल ते ढालघर फाटा, निजामपूर नाका ते कालवा रोड, मोर्बा नाका ते पवार वाडा हॉटेल तसेच इंदापूर येथील- माहि हॉटेल ते कशेने बायपास या मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ‘नो पार्किंग झोन लागू करण्यात आला आहे.

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका आणि परिवहन उपक्रमाचा वर्धापनदिन समारंभ उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

ठाण्यातील आरएमसी ट्रकमधील लपलेल्या डब्यातून लाखो रुपयांची ” पुष्पा चित्रपटाची स्टाईल ” दारू जप्त.

vishwatmaklokswamivarta

अमरावतीत 19 मे रोजी रोजगार मेळावा;महिंद्र ॲन्ड महिंद्र’ कंपनीत हजार जागांवर प्रधानमंत्री इंटर्नशिपची संधी