vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सिरोंचा उपविभागात गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहनपाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता..

सिरोंचा उपविभागात गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहनपाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता..

गडचिरोली प्रतिनिधी : कालपासून सुरू असलेला संततधार पाऊस तसेच विविध धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे गोदावरी नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने सिरोंचा उपविभागात गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगाण्याचे व आवश्यकतेनुसार शासकीय निवारागृहात आश्रय घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

 गोदावरी उपखोऱ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तेलंगणा राज्यातील कड्डम प्रकल्प तसेच श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पातून पाण्याच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. यासोबतच वर्धा, वैनगंगा व प्राणहिता नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे या नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. गोदावरी नदीच्या विसर्गाची क्षमता 9 लाख क्युसेक असून सध्या 5 ते 6 लाख क्युसेक पर्यंत पाण्याचा प्रवाह सुरू आहे. मात्र विविध प्रकल्पातील विसर्गामुळे यात अजून सहा लाख क्युसेक पर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याने सिरोंचा तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

जिल्हाधिकारी पंडा यांनी राज्य आपत्ती पथकाच्या दलाला तसेच महसुल, पोलीस, ग्रामपंचायत व इतर यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या व आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत

0000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोक अदालतीत ४ हजार ३६१ प्रकरणांचा निपटारा१९.१७ कोटींची तडजोड रक्कम वसूल..

हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० वे शहीदी समागम वर्ष-जिल्ह्यातील शाळांमध्ये माहितीपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी

vishwatmaklokswamivarta

दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे वाहतूक व मालवाहतूक वेगवान होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्ग प्रकल्पाची पाहणी

ठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; १.२० कोटींचा मुद्देमाल जप्त नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य दक्षता पथकाची कारवाई; तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

नुतन वर्षानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल*नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्राचे ‘स्टेट मन्युफॅक्चरिंग मिशन’ सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’ चे प्रकाशन‘ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta