vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका आणि परिवहन उपक्रमाचा वर्धापनदिन समारंभ उत्साहात साजरा

नवी मुंबई महानगरपालिका आणि परिवहन उपक्रमाचा वर्धापनदिन समारंभ उत्साहात साजरा

 

         नवी मुंबई प्रतिनिधी प्रतिनिधी ग्रामपंचायतीतून थेट महानगरपालिकेत रुपांतरित झालेली नवी मुंबई महानगरपालिका ही देशातील लक्षवेधी महापालिका असून 1995 साली पहिली निवडणूक झाल्यानंतर केवळ सहा महिन्यात स्वत:ची बससेवा सुरु करणारीही पहिलीचा महानगरपालिका असल्याचे सांगत महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी यापुढील काळात महानगरपालिकेच्या अधिक सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली जातील असे मत व्यक्त केले. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा अशा सर्वच बाबींमध्ये महानगरपालिका स्वयंपूर्ण असावी यादृष्टीने यापुढील काळात पावले उचलावीत अशा सूचना देत ना.श्री.गणेश नाईक यांनी क्लश्टर डेव्हलपमेंट योजनाही सर्व घटकांना समान न्याय देत राबविली जाईल असे सांगितले. लोकाभिमुख पध्दतीने शासन, प्रशासन वाटचाल करेल असेही ते म्हणाले.

  नवी मुंबई महानगरपालिकेचा 33 वा आणि नमुंमपा परिवहन उपक्रमाचा 29 वा वर्धापनदिन समारंभ वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात उत्साहात संपन्न झाला. याप्रंसगी ते आपले मनोगत व्यक्त्‍ करीत होते. यावेळी व्यासपीठावर बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त्‍ डॉ.कैलास शिंदे, माजी खासदार डॉ.संजीव नाईक, अतिरिक्त्‍ आयुक्त्‍ श्री.सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक श्री.योगेश कडुसकर, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. तुषार दौंडकर व इतर अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 याप्रसंगी बोलताना बेलापूर विधानसभा सदस्य आमदार.श्रीम.मंदाताई म्हात्रे यांनी वर्धापनदिनदिनाच्या शुभेच्छा देताना अधिकारी, कर्मचारी करीत असलेल्या कामाची प्रशंसा केली. नवी मुंबई महानगरपालिकेचा नावलौकिक वाढविण्यासाठी सर्वच घटकांचे योगदान असल्याचे सांगत त्यांनी कामकाजातील सुधारणांबाबत विविध सूचना केल्या.

महापालिका आयुकत्‍ डॉ.कैलास शिंदे यांनी मागील वर्षभरातील उल्लेखनीय कामांचा आढावा घेत आगामी काळात वाढत्या लोकसंख्येनुसार वाढती आव्हाने लक्षात घेत नागरी सुविधांमध्ये पुरेशा प्रमाणात वाढ करण्यासाठी पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, पर्यावरण अशा विविध सेवांमध्ये करण्यात येत असलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. नवी मुंबईकर नागरिकांना समाधानकारक सेवासुविधा पुरविण्यासाठी व त्यांचे जीवन आनंदी बनविण्यासाठी महानगरपालिका कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना घरबसल्या महानगरपालिकेशी संबंधित सुविधा उपलब्ध्‍ होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन पोर्टल व ॲप कार्यान्वित असल्याची माहिती देत परिवहन उपक्रमानेही ज्येष्ठ नागरिकांना मोफत बसपास योजना जाहिर केली असून त्यासाठी ऑनलाईन स्मार्टकार्ड सुविधा उपलब्ध्‍ करुन दिली जात असल्याचे सांगितले

   परिवहन व्यवस्थापक श्री.योगेश कडुसकर यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त्‍ करताना नवी मुंबईची प्रवासी जीवनवाहिनी अशी ओळख असणाऱ्या एनएमएमटी उपक्रमाने 25 बसपासून सुरुवात करुन आज 543 बसेसपर्यंत झेप घेतल्याचे सांगितले. 73 बसमार्गांवर दररोज 2.25 लाख प्रवाशांना प्रवासी सेवा पुरविणारा एनएमएमटी उपक्रम अधिकाधिक प्रवासी उपयोगी व पर्यावरणशील उपक्रम म्हणून नावाजला जाईल यादृष्टीने कार्यवाही करण्यात येईल असे ते म्हणाले.

याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेतील गुणवंत अधिकारी, कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये सहाय्यक आयुक्त्‍ तथा विभाग अधिकारी श्री.संजय तायडे, प्रशासकीय अधिकारी श्री.विलास मलुष्टे, वैदयकीय अधिकारी डॉ.मुस्तफा झकेरिया, कार्यकारी अभियंता श्री. अजय संखे, लेखाधिकारी श्री.दर्शन तांडेल, क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव, उप अभियंता पाणीपुरवठा श्री.अजित भवारी, सहा.लेखाधिकारी श्री.प्रविण मार्के, अधिक्षक श्रीम.रजिता वैती, स्टाफ नर्स श्रीम.वंदना गायकवाड, सहा.अग्निशमन अधिकारी श्री.पदाजी निरगुडे, कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा श्री. विजय कोरपाळे, कनिष्ट अभियंता विदयुत श्री.संदीप ठाकूर, स्वच्छता निरीक्षक श्री. पवन कोवे, स्वच्छता निरीक्षक श्री.विजय नाईक, वरिष्ठ लिपीक श्रीम.मोहिनी केनी, वरिष्ठ लिपिक श्री. चिमण बांगर, समुह संघटक श्रीम.प्रतिक्षा हुंडारे, लिपिक टंकलेखक श्री.संकेत चौधरी, वाहन चालक श्री.यशवंत पाटील, शिपाई श्री.दिपक जाधव अशा 21 अधिकारी, कर्मचारी यांना गौरविण्यात आले.

     तसेच एनएममएटी उपक्रमातील चालक श्री.उत्तम कांबळे व श्री.हनुमंत रेवे आणि वाहक श्री.शामकांत पाटील या विशेष कामगिरी कर्मचाऱ्यांना त्याचप्रमाणे चालक श्री.कैलास घायतडक, श्री.शिवाजी सोनवते, तुकाराम मुरादे यांना विनाअपघात सेवेबद्दल आणि मदतनीस श्री.मोहन पाटील यांना सीएनजी बस डॉकिंगचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. वर्षभराच्या कालावधीत सर्वाधिक रकमेची तिकीट विक्री करणाऱे वाहक श्री.संजय पाटील(रु.22 लाख +), श्री.बापूसाहेब मोरे (रु.20 लाख +) आणि श्री.विष्णू बेनके (रु.18 लाख +) यांनाही गौरविण्यात आले.

  त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका वर्धापनिदिनानिमित्त्‍ आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट (पुरुष व महिला), व्हॉलीबॉल (पुरुष), बॅडमिंटन – डबल (पुरुष), थ्रोबॉल (महिला), 100 मी. धावणे (पुरुष), 100 मी धावणे(40 वर्षावरील व 40 वर्षाखालील महिला दोन गट), गोळाफेक (पुरुष व महिला), बुध्दिबळ (पुरुष व महिला), कॅरम (पुरुष व महिला) या क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना व उत्कृष्ट खेळाडूंना गौरविण्यात आले.  त्याचप्रमाणे वैयक्तिक गायन, समुह गायन, वैयक्तिक नृत्य, समुह नृत्य, नाटयाविष्कार, पाककला, रांगोळी, सुपर वुमन अशा सांस्कृतिक स्पर्धांतील विजेत्या कलावंतांना व कला समुहांना सन्मानित करण्यात आले.  त्याचप्रमाणे एनएमएमटी उपक्रमातील कॅरम, बुध्दीबळ, व्हॉलीबॉल, थ्रो बॉल, कबड्डी (45 वर्षाखालील व वरील दोन गट), रस्सीखेच, क्रिकेट अशा क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांचा गुणवंत पाल्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे जल्लोषात सादरीकरण झाले

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ विकसित भारताचे स्वप्न साकारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकसित महाराष्ट्र २०४७ मसुदा सल्लागार समितीची बैठक संपन्न…

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांसाठी महाविस्तार एआय अप शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र..

vishwatmaklokswamivarta

निवडणूक आयोगाची नवी डिजिटल प्रणाली-इंडेक्स कार्ड व आकडेवारी अहवालांची जलद निर्मिती..

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिराळा शाखेत सामाजिक सुरक्षिततेबाबत मेळावा साजरा

vishwatmaklokswamivarta

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अन्न व्यवसाय चालकांसाठी अन्न सुरक्षा मार्गदर्शक सूचना;सूचनांचे काटेकोर पालन करा-अन्न सुरक्षा विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

vishwatmaklokswamivarta