vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विधानसभा लक्षवेधी सूचना :शहरातील शाळा इमारतींच्या फायर ऑडिट संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना– नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

विधानसभा लक्षवेधी सूचना :शहरातील शाळा इमारतींच्या फायर ऑडिट संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना– नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, प्रतिनिधी : मुंबईसारख्या महानगरात उंच शाळा इमारती, हॉटेल्स, गर्दीच्या बाजारपेठा यामुळे अग्निसुरक्षेच्या उपाययोजना अत्यावश्यक आहेत. कुर्ला पश्चिम येथील ‘रंगून जायका’ हॉटेलला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील शाळा इमारतींसह सर्व आस्थापनांची फायर ऑडिट तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत सांगितले.

या प्रकरणी विधानसभा सदस्य मंगेश कुडाळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत विधानसभा सदस्य योगेश सागर यांनीही सहभाग घेतला.

कुर्ला पश्चिम येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील ‘रंगून जायका’ हॉटेलला लागलेली आग हॉटेलमधील सदोष वीज प्रणालीमुळे लागल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे. या हॉटेलकडे कोणताही आरोग्य परवाना, अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र किंवा व्यापार परवाना नव्हता. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नोटीस बजावण्यात आली आहे.

महानगरपालिकेने अनधिकृत उपहारगृहांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात ‘अग्निसुरक्षा पालन कक्ष’ स्थापन केले असून, या कक्षामार्फत उपहारगृहांची तपासणी केली जाते. अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नसलेल्या आस्थापनांचा इंधन साठा जप्त करणे तसेच इंधन पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही केली जाते, असेही राज्यमंत्री मश्रीमती मिसाळ यांनी सभागृहात सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक -सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला प्रारंभ : २३ देशांतील १९ हजार भाविकांची उपस्थिती *गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात !* – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा  *गोवा सरकारच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा विशेष सन्मान*

वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अभिवादन

जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा दौरा 

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता १३ आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाईन परीक्षा ….

vishwatmaklokswamivarta

३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण,”हा लोगो म्हणजे नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ आहे.” – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

मालवणीचा गोडवा, ठसका जगभर पोहोचविणाऱ्या प्रतिभावंताला मुकलो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वस्त्रहरणकार ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली…

vishwatmaklokswamivarta